दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ एका नव्या पेचात अडकला आहे. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ऋषभ पंतची अनुपस्थिती संघासाठी फारच वाईट गोष्ट ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी येथे होणार आहे. याचदरम्यान दिल्लीने आगामी सामन्यासाठी संघाचा कर्णधार कोण असेल, हे सांगितले आहे.
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आता अक्षर पटेल अनेकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतवर दंडासह एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलच्या या मोसमात संथ षटकांमुळे कर्णधारावर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा परिस्थितीत आता अक्षर पटेल ऋषभ पंतची जबाबदारी पार पाडेल.
हेही वाचा- ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
रिकी पॉन्टिंगने पत्रकार परिषदेत सांगितले की, अक्षर पटेल उद्या संघाचा कर्णधार असेल. तो गेल्या काही सामन्यांमध्ये संघाचा उपकर्णधार आहे. अक्षर एक सर्वात अनुभवी आयपीएल खेळाडू आहे तर आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही त्याला अनुभव आहे. जो खेळ खूप चांगल्या पध्दतीने समजतो.
हेही वाचा – IPL 2024: ऋषभ पंतवर बीसीसीआयने घातली एका सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, वाचा कारण
७ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० धावांनी जिंकलेल्या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतला ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. या सामन्याच्या शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघ निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे मागे होता. ऋषभ पंतने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने ४१३ धावा केल्या आहेत. तर पंतने यष्टीरक्षण करताना या मोसमात १४ फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. ऋषभ पंतला गुजरातविरूदध्च्या सामन्यात यष्टीरक्षण आणि फलंदाजासाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.