Andre Russell Out Of Form In IPL 2023 : आयपीएल २०२३ मध्ये अनेक मोठे खेळाडू आहेत, ज्यांनी अजूनही चांगली कामगिरी केली नाहीय. यामध्येच कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या नावाचा समावेश झाला आहे. रसेलने टीमसाठी पहिल्या तीन सामन्यात खास कमाल केली नाहीय. त्यामुळे केकेआर रसेलला ड्रॉप करणार का? अशा चर्चा क्रीडाविश्वात रंगू लागल्या होत्या. परंतु, केकेआरचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंद्रे रसेलचा खराब फॉर्म असला, तरीही केकेआर रसेला ड्रॉप करणार नाही, असं मॉर्गनने म्हटलं आहे.

आंद्रे रसेलला केकेआरचा हुकमी एक्का म्हणतात. परंतु, त्याने अजूनही चमकदार कामगिरी केली नाहीय. त्यामुळे केकेआरच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. रसेलने टूर्नामेंटची सुरुवात ३५ धावांच्या खेळीने केली होती. परंतु, मागील दोन सामन्यात तो शून्य आणि एका धावेवर बाद झाला. तसंच गोलंदाजीतही अजून एकही षटक टाकलं नाहीय. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी रसेलला टीममधून बाहेर करण्याची मागणी केल्याचं समजते.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Narendra Modi wished Mohammed Shami his best for recovery from heel surgery
Mohammed Shami : ”तुम्ही या दुखापतीवर धैर्याने…”, शमीच्या शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दिला धीर

नक्की वाचा – PBKS vs GT: शिखर धवनने पंजाब किंग्जच्या फलंदाजांना झापलं, म्हणाला,” तुम्ही सामना जिंकू शकत नाही, कारण…”

केकेआर मोठ्या खेळाडूंवर अवलंबून नाही – इऑन मॉर्गन

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना मॉर्गन ने म्हटलं, फ्रॅंचायची रसेलवर विश्वास ठेवणार. रसेलला बाहेर गेलेलं पाहायचं नाहीय. टीम यावेळी कॅरेबियाई ऑलराऊंडरवर अवलंबून नाहीय. रसेल टीममधून बाहेर जाईल, अशी परिस्थिती नाहीय. त्याने मागील वर्षी आयपीएलमध्ये धावा केल्या होत्या. केकेआर त्याच्यावर किंवा नायरायणवर अवलंबून राहत नाही. तसंच कर्णधाराचीही कमी भासत नाहीय, हे आम्हाला विसरून चालणार नाही.