सर्वच क्रिकेटरसिकांना प्रतिक्षा असलेली घोषणा अखेर झालीय. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगली यांनी आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाणाची घोषणा केलीय. आयपीएल २०२२ चे सर्व साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार हे आधीच स्पष्ट होतं. मात्र, प्ले ऑफ आणि अंतिम सामना कधी आणि कोठे होणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर त्यावरीलही पडदा हटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, आयपीएल २०२२ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तसेच प्ले ऑफ आणि इलेमिनेटर सामने अनुक्रमे २४ मे आणि २६ मे रोजी कोलकात्यात होणार आहे. दुसरा प्ले ऑफ सामना २७ मे रोजी अहमदाबादमध्ये होईल.

आयपीएल २०२२ प्ले ऑफ आणि अंतिम सामना वेळापत्रक

आयपीएल २०२२ प्लेऑफ पहिला सामना – २४ मे २०२२ – कोलकाता
आयपीएल २०२२ एलिमिनेटर – २६ मे २०२२- कोलकाता
आयपीएल २०२२ प्लेऑफ दुसरा सामना – २७ मे २०२२ – अहमदाबाद
आयपीएल २०२२ फायनल – २९ मे २०२२ – अहमदाबाद

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेची घोषणा

याशिवाय बीसीसीआयने भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचीही घोषणा केली.

दक्षिण अफ्रिका विरुद्धची टी-२० मालिका वेळापत्रक सीरीज का शेड्यूल

९ जून २०२२ – पहिला टी-२० सामना – दिल्ली
१२ जून २०२२- दुसरा टी-२० सामना – कटक
१४ जून २०२२ – तिसरा टी-२० सामना – विजाग
१७ जून २०२२ – चौथा टी-२० सामना – राजकोट
१९ जून २०२२ – पाचवा टी-२० सामना – बंगळुरू

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील हे ५ सामने जून २०२२ मध्ये होणार आहेत.

महिला टी-२० चॅलेंज

बीसीसीआयने वुमेंस टी-२० चॅलेंज सामन्यांचीही घोषणा केली. यंदा ३ संघामधील वुमेंस टी-२० चॅलेंजच्या आयोजनाची संधी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला मिळणार आहे. ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलॉसिटीमधील हे सामने लखनऊमध्ये खेळले जाणार आहेत. सध्या सुरू असलेल्या वुमेंस टी-२० ट्रॉफी संपल्यानंतर मे महिन्यात तिन्ही संघाची निवड केली जाणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announcement of ipl 2022 final and play off match date place by bcci pbs
First published on: 23-04-2022 at 22:11 IST