आयपीएलमधील प्लेऑफचे सामने रात्री आठऐवजी सायंकाळी सात वाजता सुरू करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार अनुराग चौधरी यांनी विरोध दर्शवला आहे.
आयपीएल संयोजन समितीचे मुख्य राजीव शुक्ला यांनी प्लेऑफचे सामने सात वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सामने संपल्यानंतर होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभास उशीर होतो. त्याबाबत काही प्रायोजकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळेच आयपीएल संयोजन समितीने वेळेत बदल केला होता.
चौधरी यांनी याबाबत विरोध दर्शविला असून त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यवस्थापन समितीला पत्र लिहिले आहे. वेळेत बदल करण्याबाबतचा निर्णय स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घ्यायला पाहिजे होता. स्पर्धा संयोजन समितीच्या सुरुवातीच्या बैठकीत सर्व बाजू लक्षात घेऊनच रात्री आठ वाजता प्लेऑफचेही सामने सुरू करण्याचा निर्णय झाला होता. पुन्हा त्यामध्ये बदल करणे अयोग्य आहे.
