आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एकीकडे पाकिस्तान यजमानपदासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे आशियाई क्रिकेट परिषद नव्या यजमानाच्या शोधात आहे. वास्तविक, “ACC चे अध्यक्ष जय शाह आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षीच भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते, तटस्थ देशात हे होऊ शकते.” असे ते म्हणाले होते. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आले आहे. आशिया चषकाबाबत जय शाहने मोठे वक्तव्य केले आहे.

जय शाह म्हणाले, “बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे संबंधित अध्यक्ष २८ मे रोजी अहमदाबादला येतील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या टाटा आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये हे सर्व सहभागी होणार आहेत. आशिया चषक २०२३ बाबत भविष्यातील कृती ठरवण्यासाठी आम्ही त्याच्याशी चर्चा करू.” विशेष म्हणजे त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांचे नाव नाही.

Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
west bengal chief minister bidhan chandra roy include berubari in indian territory from east pakistan
कचाथीवू गमावले, पण बेरूबारी कमावले… नेहरूंचा विरोध डावलून बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी कसा मिळवला पूर्व पाकिस्तानकडून भारतीय भूभाग?

आशिया चषक आपल्या देशात व्हावा यासाठी नजम सेठी उत्सुक आहेत. पाकिस्तानने आशिया चषक बाहेर न्यायला विरोध करत हायब्रीड मॉडेलही देऊ केले होते. ‘हायब्रीड मॉडेल’वर स्पर्धा आयोजित करण्याचा पीसीबीचा प्रस्ताव सदस्य राष्ट्रांनी फेटाळला. पाकिस्तान आपले सर्व सामने आपल्याच देशात खेळेल, असे या मॉडेलमध्ये सांगण्यात आले होते. त्याचबरोबर टीम इंडिया आपले सामने यूएई, दुबई, ओमान किंवा श्रीलंकेत खेळू शकते.

हेही वाचा: IPL2023: “आजच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूच असे वागत असल्यास…”, कोहली-गौतम वादावर कपिल देव यांचे गंभीर भाष्य

एसीसीचे म्हणणे आहे की, “यूएईमध्ये सप्टेंबर महिन्यात प्रचंड उष्णतेमुळे खेळाडूंना दुखापत होण्याची भीती आहे.” अशा स्थितीत सहा देशांच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याच्या शर्यतीत श्रीलंका आघाडीवर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अनेकवेळा धमकी दिली आहे की, जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही, तर त्यांचा संघ यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकावरही बहिष्कार टाकेल.

याशिवाय, बीसीसीआय पाकिस्तानशिवाय आशिया कपच्या धर्तीवर इतर आशियाई देशांसोबत टूर्नामेंट आयोजित करत असल्याचा आरोपही पीसीबीने केला होता. मात्र, बीसीसीआयने या गोष्टींचा इन्कार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नजम सेठी यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे की, “जर पाकिस्तानमध्ये आशिया कपचे सामने झाले नाहीत तर पाकिस्तानचा संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही.”

हेही वाचा: MI vs LSG Eliminator: आला रे! एमआय पलटणचा डंका, मुंबईचा लखनऊवर ८१ धावांनी दणदणीत विजय

या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे

भारतात या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यापूर्वी असे वृत्त येत होते की, BCCI ने अट घातली आहे की, पाकिस्तानी संघ विश्वचषकासाठी भारतात येण्यास आधी PCB मान्यता देईल, त्यानंतरच पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलचा विचार केला जाईल, परंतु आता असे काही नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेणार असल्याचे कळते. यासोबतच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मेगा सामना पाकिस्तानमध्ये होणार नाही, ज्याचे तटस्थ ठिकाण निश्चित केले जाईल, असा निर्णयही घेण्यात आला आहे. आयपीएल संपल्यानंतर अंतिम निर्णय एसीसी घेईल आणि वेळापत्रकही जाहीर केले जाईल, असे कळते.