रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जांयट्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात बंगळुरुचा १८ धावांनी विजय झाला. हा सामना जिंकण्यासाठी लखनऊने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र १८२ धावा हव्या असताना लखनऊ संघाला १६३ धावांपर्यंतच मजल मारता आली. बंगळुरु संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत लखनऊच्या फलंदाजांना ठराविक अंतराने तंबुत पाठवलं. एकएक फलंदाज बाद होत गेल्यामुळे लखनऊचे चाहते चांगलेच निराश झाले होते. विशेष म्हणजे केएल राहुल बाद झाल्यानंतर त्याची प्रेमिका अथिया शेट्टीचा चेहरा चांगलाच उतरला होता. राहुल बाद झाल्यानंतर अथियाने दिलेल्या रिअॅक्शनची संध्या चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 : आधीच पराभवाचे शल्य, त्यात आयपीएलने ठोठावला मोठा दंड, केएल राहुलला दुहेरी फटका

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १८२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लखनऊ संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र लखनऊची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकात सलामीला आलेला क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. त्यानंतर लखनऊची ३३ धावांवर दोन गडी बाद अशी दयनीय स्थिती झाली. दुसरीकडे दबाव वाढेलला असताना केएल राहुला संघासाठी धावा करत होता. मात्र ३० धावांवर खेळत असताना आठव्या षटकात हर्षल पटेलने त्याला बाद केलं. हर्षल पटेलने टाकलेला चेंडू बॅटची किनार पकडून थेट यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. मात्र दिनेश कार्तिकने अपील न केल्यामुळे पंचानेदेखील राहुलला बाद जाहीर केले नाही.

हेही वाचा >>> LSG vs RCB : “आम्ही त्यांना २० अतिरिक्त धावा दिल्या”; लखनऊच्या पराभवानंतर संतापला केएल राहुल

त्यानंतर मात्र गोलंदाज हर्षल पटेल, दिनेश कार्तिक आणि फाफ डू प्लेसिस यांनी विचार करुन डीआरएस घेतला. थर्ड अंपायरने अल्ट्रा एजच्या मदतीने तपासणी केली असता चेंडू राहुलच्या बॅटला लागल्याचे समजले. त्यानंतर केएल राहुलला झेलबाद जाहीर करण्यात आले. बंगळुरुने योग्य वेळी डीआरएस घेतल्यामुळे सामना फिरवण्याची ताकद असलेला केएल राहुल बाद झाला. परिणामी लखनऊ संघ खिळखिळा झाला आणि बंगळुरुचा १८ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >>> RCB vs LSG : बाद झाल्यानंतर संतापलेल्या मार्कस स्टॉइनिसने केली शिवीगाळ; पहा VIDEO

केएल राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी सामना पाहण्यासाठी आली होती. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून ती राहुलची खेळी पाहत होती. याआधीही तिने अनेकवेळा लखनऊ सुपर जायंट्सच्या सामन्याला हजेरी लावलेली आहे. बंगळुरुने डीआरएस घेतल्यानंतर राहुल बाद झाल्यामुळे अथिय शेट्टीचा चेहरा चांगलाच पडला होता. केएल राहुललने २४ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या.