scorecardresearch

पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या

रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४ बाद २०७ धावसंख्या उभारली.

कोलकाता : रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनी ‘आयपीएल’मधील एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २० षटकांत ४ बाद २०७ धावसंख्या उभारली. ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात पटिदारने आपल्या शतकी खेळीत १२ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. त्याने विराट कोहलीसोबत (२५ धावा) दुसऱ्या गडय़ासाठी ६६ धावांची आणि दिनेश कार्तिकसह (नाबाद ३७) पाचव्या गडय़ासाठी ६.५ षटकांत ९२ धावांची अभेद्य भागिदारी रचली. पटिदार आणि कार्तिकने हाणामारीच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे बंगळूरुने अखेरच्या पाच षटकांत ८४ धावा केल्या. पटिदार यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला.

पावसाच्या व्यत्ययामुळे ‘एलिमिनेटर’चा सामना जवळपास ४० मिनिटे उशिराने सुरु झाला. परंतु, षटकांची संख्या कमी करण्यात आली नाही. लखनऊचा कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहसिन खानने बंगळूरुचा कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिसला खाते न उघडताच माघारी धाडले. यानंतर कोहली आणि पटिदारने संघाचा डाव सावरला.

संक्षिप्त धावफलक 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : २० षटकांत ४ बाद २०७ (रजत पटिदार नाबाद ११२, दिनेश कार्तिक नाबाद ३७, विराट कोहली २५; मोहसिन खान १/२५) वि. लखनऊ सुपर जायंट्स. (अपूर्ण)

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bangalore challenging score patidar century career match ysh

ताज्या बातम्या