Gautam Gambhir Statement on Virat Kohli Strike Rate : आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी शानदार फलंदाजी करत आहे. तो या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणाही लवकरच केली जाणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी टी-२० फॉरमॅटमध्ये विराट कोहलीच्या बॅटिंग स्ट्राईक रेटबाबत चर्चा होत आहेत. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरने कोहलीच्या स्ट्राईकबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

विराट कोहली ऑरेंज कपच्या शर्यतीत अव्वल –

विराट कोहलीने आयपीएलमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या असून दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ४३० धावा केल्या आहेत आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. या कालावधीत त्याने ३ अर्धशतके आणि १ शतकही झळकावले आहे. त्याचा स्ट्राइक रेट १४५.७६ आहे. गौतम गंभीरने कोहलीच्या फलंदाजीच्या स्ट्राईक रेटवर मोठे वक्तव्य केले असून या फॉरमॅटमध्ये संघाच्या विजयावर सर्व काही अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Hardik Pandya breaks his silence
T20 WC 2024 : घटस्फोटाच्या चर्चांवर आणि कठीण परिस्थितीवर हार्दिक पंड्याने सोडले मौन; म्हणाला, “कधीकधी आयुष्य तुम्हाला…”
Brydon Carse banned all format
Brydon Carse : इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजावर बंदी, सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई
SRH Scores Lowest Total in IPL Finals
IPL 2024 Final: KKR च्या गोलंदाजांचा तिखट मारा अन् SRH ची सपशेल शरणागती, हैदराबादच्या नावे IPL इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Shreyas Iyer Statement on Back Injury Struggle
“माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं…” वर्ल्डकपनंतरच्या पाठीच्या दुखापतीवरून श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा
Brett Lee on Jasprit Bumrah
T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Rohit sharma statement on Mumbai Indians and His Batting performance
IPL 2024: रोहित शर्माने अखेरीस सोडले मौन, MIच्या कामगिरीबद्दल झाला व्यक्त; फलंदाजीबाबतही दिले प्रामाणिक उत्तर

चांगल्या संघात प्रत्येक प्रकारचे खेळाडू असतात’ –

स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना गौतम गंभीर कोहलीच्या स्ट्राईक रेटबद्दल म्हणाला, “सर्व काही संघाच्या विजयावर अवलंबून आहे. जर तुमचा संघ जिंकत असेल तर कोणाला पर्वा नाही. तुमचा संघ हरत असेल तर सगळेच टीका करतात. तेव्हा त्या सर्व गोष्टी समोर येतात, ज्यांच्यामुळे पराभव झाला होता. त्यामुळे जे मॅक्सवेल करू शकतो, कोहली करू शकत नाही आणि कोहली जे करू शकतो, ते मॅक्सवेल करू शकत नाही. चांगल्या संघात प्रत्येक प्रकारचे खेळाडू असतात.”

हेही वाचा – VIDEO : एमएस धोनीच्या IPL मधील यशाचे आणि फिटनेसचे काय आहे गुपित? स्वत: माहीनेच केला खुलासा

विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल गंभीर काय म्हणाला?

विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ‘जर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व एक सारखेच खेळाडू निवडले, तर तुम्ही ३०० धावा करू शकता आणि ३० वरही सर्वबाद होऊ शकता. त्यामुळे चांगला संघ म्हणजे सर्व प्रकारचे खेळाडू असणे आणि संघ जिंकणे महत्त्वाचे आहे. तुम्ही १०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि संघ जिंकला तर ते देखील चांगले आहे, परंतु जर तुम्ही १८० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि संघ हरला तर कोणीच काही बोलत नाही.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा

‘संघाच्या गरजेनुसार खेळले पाहिजे’ –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “हे खरं आहे की स्ट्राईक रेट महत्त्वाचा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. तुमची धावसंख्या ५०/२ किंवा ५०/४ असेल, तर तुम्ही १७० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करण्याची अपेक्षा करू शकत नाही, परंतु जर तुम्ही ६ षटकात एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या असतील, तर तुम्हाला स्ट्राइक रेट वाढवावा लागेल. त्यामुळे संघाच्या गरजेनुसार खेळले पाहिजे.”