Brad Hogg says Dhoni using his presence to full effect: चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी गुजरात टायटन्सचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १७२ धावा केल्या. गुजरात टायटन्सला २० षटकांत केवळ १५७ धावा करता आल्या. चेन्नईच्या विजयात त्याचा युवा गोलंदाज मथीशा पथिरानाने महत्त्वाची भूमिका बजावली. महेंद्रसिंग धोनीने या प्रभावशाली खेळाडूकडून षटक टाकून घेण्यासाठी मोठी हुशारी दाखवली, पण ऑस्ट्रेलियन अनुभवी ब्रॅड हॉगला माहीची ही चाल आवडली नाही.

धोनीने दाखवली हुशारी –

पथिराना १६ वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा अंपायरने त्याला थांबवले. नियमानुसार, जर पथिराना आधी मैदानाबाहेर असेल, तर तो ठराविक वेळेनंतरच गोलंदाजी करू शकत होता. धोनीने याबाबत पंचांशी बोलण्यास सुरुवात केली आणि प्रतीक्षाची वेळ संपली. यामुळे पथिरानाला षटक टाकण्यासाठी थांबावे लागले नाही.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा – CSK vs GT: सीएसकेने गुजरातविरुद्ध नोंदवला सर्वात मोठा विक्रम, कोणत्याच संघाला न जमलेला केला ‘हा’ पराक्रम

ब्रॅड हॉग अंपायरवर संतापला –

महेंद्रसिंग धोनीचे हे कृत्य ब्रॅड हॉगच्या पचनी पडले नाही. lत्याने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, ‘धोनीने त्याच्या उपस्थितीचा फायदा घेतला आणि पथिराणाला गोलंदाजी करता यावी म्हणून पंचांची ४ मिनिटे वाया घालवली. ते थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते, तेव्हा या घटनेवर पंच हसत होते. पथीरानाने सामन्यात दोन विकेट घेतल्या.

धोनीने निवृत्तीबाबत विधान केले –

अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनेही निवृत्तीबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, ‘मी आयपीएल खेळणार की नाही, मला माहित नाही. हा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आणखी ८-९ महिने आहेत. मग त्याचा विचार आतापासून का करायचा? मी खेळेन किंवा नाही याबाबत आत्ताच सांगू शकत नाही. मात्र, नेहमीच सीएसकेसाठी उपस्थित राहीन.’

हेही वाचा – IPL 2023: “एमआयला हरवायला मजा येईल, त्यांच्याशी आमचे जुने…”; चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची मुंबईविरुद्ध फायनल खेळण्याची इच्छा

आयपीएल २०२३च्या विजेत्यापदाचा प्रबळ दावेदार –

सीएसके संघ २००८ पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४ हंगाम खेळले आहेत, ज्यामध्ये संघ १२ वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे आणि १० वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही सीएसके संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.