scorecardresearch

MI vs GT: “… जगातील सर्वात सोपे काम”; दुसऱ्या क्वालिफायर सामन्यापूर्वी कॅमेरुन ग्रीनच मोठं वक्तव्य

Cameron Green: आयपीएल २०२३ मधील दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Cameron Green said batting with Suryakumar Yadav is the easiest job in the world
कॅमेरुन ग्रीन ( फोटो-ट्विटर)

Cameron Green Statement: लखनऊ विरुद्ध मुंबई यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ वर ८१ धावांनी मोठा विजय नोंदवला. त्याचबरोबर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबईचा सामना गुजरातसोबत होणार आहे. तत्पुर्वी गुजरात टायटन्सचा पहिल्या क्वलिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव झाला होता.

मुंबई इंडियन्सच्या या मोसमातील कामगिरीबद्दल बोलायाचे, तर संघाने गेल्या मोसमातील वाईट आठवणी विसरून क्वालिफायर २ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. जेव्हा मुंबई इंडियन्सला कॅमेरून ग्रीननची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्याने १७.५ कोटी दिल्याचे सार्थक केले. सुरुवातीच्या संघर्षानंतर त्याचा संघ आता आयपीएल विजेतेपदापासून दोन पावले दूर असल्याचा त्याला आनंद आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळेल.

कॅमेरून ग्रीन स्टार स्पोर्ट्सवर रोहित शर्माबद्दल बोलताना म्हणाला, “रोहित शर्माला सर्व माहित आहे. त्याला भारतासाठी आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा इतका अनुभव आहे. मला वाटते की, मुंबईने आयपीएलमधील पहिला सामना कधीच जिंकला नाही आणि याबद्दल त्याने सांगितले. आणि त्याने तसे सांगितले. हे सर्वात महत्वाचे आहे. तो म्हणाला, आपला सुरुवात संथ राहिली, पण आपण योग्य वेळी सर्वोत्तम कामगिरी करत आहोत. हे सर्वात महत्वाचे आहे.

हेही वाचा – IPL 2023: “…म्हणून आकाशवर बंदी घालण्यात आली”; मुंबईसाठी खेळणाऱ्या भावाबद्दल आशिष मधवालाचा मोठा खुलासा

कॅमेरून ग्रीन सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगबद्दल म्हणाला, की सूर्यकुमार यादवसोबत फलंदाजी करणे ही जगातील सर्वात सोपी गोष्ट आहे. तो म्हणाला, “मला वाटते की हे जगातील सर्वात सोपे काम आहे. त्याला स्ट्राइक द्यायची असतो आणि जर तुम्हाला लूज बॉल मिळाला तर त्याला सीमारेषेवर पाठवायचे आहे.”

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल –

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम हे त्याच्या फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीसाठी प्रसिद्ध आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर सातत्याने उच्च स्कोअरिंग सामने पाहायला मिळतात. त्याचा सपाट ट्रॅक एकसमान बाउन्स प्रदान करतो. यामुळे फलंदाजांना त्यांचे फटके मोकळेपणाने खेळता येतात. त्याला फलंदाजांचे नंदनवन म्हणणेही अयोग्य ठरणार नाही. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडा स्विंग मिळू शकतो, परंतु फलंदाज मधल्या फळीत चांगल्या धावसंख्येची अपेक्षा करू शकतात. खेळाच्या नंतरच्या टप्प्यात फिरकीपटू आपला जलवा दाखवू शकतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 13:31 IST

संबंधित बातम्या