scorecardresearch

IPL 2023: डेव्हिड वॉर्नरने शेअर केलेल्या डान्सच्या VIDEO वर पत्नी कँडीने विचारला मजेशीर प्रश्न; म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

David Warner Dance Reel: डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी व्यावसायिक शूटमध्ये दिसला. यादरम्यान हा व्हिडिओ बनवण्यात आला असून डावखुरा फलंदाज त्यावर नाचताना दिसतो.

IPL 2023 Updates Candy Warner makes a funny comment on the dance reel
डेव्हिड वार्नर (फोटो- संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

David Warner Dance Video: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) मध्ये डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्स (DC) चे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे या डावखुऱ्या फलंदाजाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर तो फ्रँचायझी संघामध्ये सामील झाला. दरम्यान, त्याने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत.

डेव्हिड वॉर्नरने शूट दरम्यान एक मजेदार व्हिडिओ बनवून रील शेअर केली आहे. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी व्यावसायिक शूटमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान हा व्हिडिओ बनवण्यात आला. डावखुरा फलंदाज त्यावर नाचताना दिसतो. वॉर्नरने त्याला ‘ लहान मुलगा’ वाटत असल्याची टिप्पणी केली. यावर वॉर्नरची पत्नी कॅंडीने टिप्पणीने लक्ष वेधून घेतले आहे, जिने तिच्या पतीचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. तिने वॉर्नरला विचारले की तू माझ्यासाठी असा डान्स का करत नाहीस?

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो –

डेव्हिड वॉर्नरने सोशल मीडियावर रील शेअर करून लोकांचे मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो अशा परदेशी खेळाडूंपैकी एक आहे, जो भारतीय चाहत्यांना आवडतो. तो अनेकदा सोशल मीडियावर बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांचे रील बनवतो आणि शेअर करतो. लोकांना ते खूप आवडते. अशा प्रकारे तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

डेव्हिड वॉर्नरची आयपीएल कारकीर्द –

डेव्हिड वॉर्नरला गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (DC) करारबद्ध केले होते. २०२१ मध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये ४८ च्या सरासरीने आणि १५०.५२च्या स्ट्राइक रेटने २८७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ अर्धशतके झळकावली. आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने १६२ सामन्यांमध्ये १४०.६९च्या स्ट्राइक रेटने आणि ४२.०१ च्या सरासरीने ५८८१ धावा केल्या आहेत. तो यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ट्रॉफी जिंकली होती, परंतु दोघांमधील कटुता वाढल्याने दोघांचे मार्ग वेगळे झाले.

हेही वाचा – Rohit Sharma Dance: रोहित शर्माने मेहुण्याच्या लग्नात डान्स करण्यासाठी गाळला होता घाम, पाहा सराव करतानाचा VIDEO

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल २०२३ साठी संघ –

ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, अॅनरिक नॉर्टजे, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे लुंगी एनगिडी, विकी ओस्तवाल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिले रोसौ

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या