रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता दडपणमुक्त विराट कोहलीच्या फलंदाजीकडे रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सर्वाचे लक्ष असेल. बंगळूरुचा पहिला सामना पंजाब किंग्जशी होणार असून, या सामन्यात अनुक्रमे फॅफ डय़ू प्लेसिस आणि मयांक अगरवाल यांच्या नवनेतृत्वाचा कस लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हसरंगाच्या कामगिरीकडे लक्ष

Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ
ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

कोहलीने एक दशक बंगळूरुचे नेतृत्व सांभाळले. २०१६ मध्ये बंगळूरुने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. हीच बंगळूरुची ‘आयपीएल’मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्या हंगामात विराटने ९००हून अधिक धावा काढताना चार अर्धशतके नोंदवली होती. याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कोहली उत्सुक आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेझलवूड यांची उणीव बंगळूरुला भासेल. मात्र अष्टपैलू वानिंदू हसरंगाच्या कामगिरीविषयी उत्सुकता असेल.

पंजाब किंग्ज  बेअरस्टो, रबाडा नसल्याने चिंता

इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि आफ्रिकेच्या कॅगिसा रबाडा नसल्यामुळे पंजाबचा संघ अडचणीत सापडला आहे. हे दोघेही आपापल्या मालिका संपवून ‘आयपीएल’मध्ये सामील होतील. महालिलावात नऊ कोटी रुपये बोली लागलेल्या स्फोटक फलंदाज शाहरूख खानकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मयांक, शिखर धवन यांच्यावर पंजाबची प्रमुख भिस्त असेल. मात्र अन्य नवख्या खेळाडूंसह पंजाब बंगळूरुशी कसा सामना करतो, हे औत्सुक्याचे ठरेल.

’  वेळ : सायं. ७.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, २, १ हिंदी, सिलेक्ट १