IPL 2023: अखेर प्रतिक्षा संपली! चेन्नई सुपर किंग्जने लॉन्च केली नवी जर्सी; धोनी, अजिंक्य रहाणेसह सर्व खेळाडू होते उपस्थित

IPL 2023 CSK Jersey: आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी सीएसके संघाने आपली नवीन जर्सी लॉन्च केली आहे. जर्सी लॉन्च करण्याचा कार्यक्रम चेन्नईत पार पडला.

IPL 2023 Chennai Super Kings Jersey Launch
धोनी आणि रहाणे (फोटो-ट्विटर)

IPL 2023 Chennai Super Kings Jersey Launch: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचा १६ वा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज असून जोरदार सराव करत आहेत. दरवर्षी आयपीएलमध्ये संघाच्या जर्सीबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. या वर्षी आतापर्यंत सर्व संघांनी आपली जर्सी लॉन्च केली आहे, पण सीएसके संघाने आपली जर्सी लॉन्च केली नव्हती. त्यामुळे प्रत्येकजण चेन्नईच्या पिवळ्या जर्सीची वाट पाहत होता, परंतु ही प्रतिक्षा संपली आहे. कारण सीएसकेने आज आपली जर्सी लॉन्च केली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामासाठी बुधवारी त्यांची जर्सी लॉन्च केली आहे. या कार्यक्रमात संघाचा कर्णधार एमएस धोनी, बेन स्टोक्ससह इतर सर्व खेळाडू उपस्थित होते. व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना त्यांच्या जर्सी दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले होते.

सीएसके संघात सामील झालेला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेकडे कर्णधार धोनीने आपली जर्सी सुपूर्द केली. कर्णधाराव्यतिरिक्त, संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षक यांनी इतर खेळाडूंच्या जर्सींचे वाटप केले. संघात प्रथमच समाविष्ट झालेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सला ५५ क्रमांकाची जर्सी देण्यात आली.

हेही वाचा – IPL 2023: ‘…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोहित खेळणार नाही’; त्याच्या गैरहजेरीत सूर्या सांभाळणार मुंबईची धुरा

चेन्नईला आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीची आशा आहे –

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये चेन्नईची निराशाजनक कामगिरी राहिली होती. त्यांचा सीएसके संघ गुणतालिकेत १० व्या स्थानावर राहिला होता. यानंतर यंदाच्या लिलावात संघाने आपल्या संघात बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे, जो पुढील वर्षी संघाचा कर्णधारही बनू शकतो. अशा स्थितीत चेन्नईला आपल्या संघाकडून यंदा विशेष कामगिरीची अपेक्षा असेल.

चेन्नईचा संघ पहिला सामना ३१ मार्चला खेळणार –

इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) स्पर्धेचा पहिला सामना ३१ मार्च २०२३ रोजी खेळला जाईल. तसेच साखळी फेरीतील त्याचा अंतिम सामना २१ मे रोजी होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा संघ दोन एप्रिलला बंगळुरूमध्ये आमनेसामने येणार आहेत. अंतिम सामनाही २८ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

हेही वाचा – IPL 2023: ‘मला गांगुली, धोनी आणि विराटसारखे नेतृत्व करायचे नाही, कारण…’; नितीश राणाचे मोठं वक्तव्य

आयपीएल २०२३ साठी, चेन्नई सुपर किंग्ज संघ –

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंह, दीपिका, दीपिका, सिमार, , प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 12:48 IST
Next Story
IPL 2023: ‘…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोहित खेळणार नाही’; त्याच्या गैरहजेरीत सूर्या सांभाळणार मुंबईची धुरा
Exit mobile version