scorecardresearch

IPL 2022 : केन विल्यम्सनने DRS घेताच जॉनी बेअरस्टो खवळला, पंजाब-हैदराबाद सामन्यात मैदानातच राडा

हैदराबादचा टी नटराजन पाचवे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर प्रभसिमरन सिंग स्ट्राईकवर होता.

jonny bairstow and kane williamson
मैदानावर अशा प्रकारे वाद झाला. (फोटो-iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २८ वा सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. या सामन्यात पंजाब किंग्जला नमवत सनरायझर्स हैदराबादने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिक याने धडकेबाज गोलंदाजी केली. त्याने शेवटच्या षटकात तीन गडी बाद केले. तसेच एका गड्याला धावबाद केलं. दरम्यान, या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने घेतलेला डीआरएस आणि या डीआरएसला पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने केलेला विरोध हा चर्चेचा विषय ठरला.

डीआरएसमुळे नेमका काय वाद झाला ?

हेही वाचा >>> IPL 2022, PBKS vs SRH : हैदराबादचा पंजाबवर सात गडी राखून दणदणीत विजय, उमरान मलिक ठरला ‘किंग’

हैदराबादचा टी नटराजन पाचवे षटक टाकण्यासाठी आल्यानंतर प्रभसिमरन सिंग स्ट्राईकवर होता. यावेळी पाचवा चेंडू टाकल्यानंतर प्रभसिमरन पायचित झाला असावा म्हणून हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने डीआरएस घेतला. मात्र डीआरएस घेण्यापूर्वी केन यष्टीरक्षक आणि टी नटराजनशी वार्तालाप करत होता. ही चर्चा सुरु असतानाच डीआरएस घेण्यासाठीचा १५ सेंकदांचा वेळ निघूण जाण्याची वेळ आली. त्यानंतर शेवटच्या सेकंदाला केन विल्यम्सनने डीआरएस घेतला.

हेही वाचा >>> IPL 2022, PBKS vs SRH : उमरान मलिक नावाच्या वादळात पंजाब नेस्तनाबूत, घेतल्या ६ चेंडूंमध्ये ४ विकेट्स!

याच गोष्टीचा नॉन स्ट्राईकवर असलेल्या जॉनी बेअरस्टोने विरोध केला. डीआरएस घेण्यासाठीचे १५ सेकंद संपलेले असूनदेखील केनने डीआरएस घेतला. हा डीआरएस ग्राह्य धरण्यात येऊ नये असे म्हणत बेअरस्टोने पंचाकडे दाद मागितली. मात्र पंचाचने बेअरस्टोची मागणी धुडकावून लावत प्रभसिमरन सिंगला झेलबाद ठरवलं.

हेही वाचा >>> IPL 2022 : बाद होताच त्रागा! मुंबईच्या इशन किशनने भर मैदानात काढला राग, कारवाई होणार ?

हा पूर्ण प्रकार नंतर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. डीआरएससाठीचे १५ सेकंद संपलेले असूनदेखील केन विल्यम्सनने घेतलेला डीआरएस का ग्राह्य धरण्यात आला ? असा सवाल पंजाबच्या चाहत्यांनी केला. तर निर्धारित वेळेतच केनने डीआरएस घेतला होता, असे मत हैदरबाद सनरायझर्सच्या सपोर्टनसे मांडले. दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून दणदणीत विजय झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clash in pbks vs srh match in ipl 2022 after kane williamson drs argues jonny bairstow prd

ताज्या बातम्या