CSK vs GT IPL 2023 Final: आज आयपीएलच्या १६ व्या हंगामातील महाअंतिम सोहळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघाना आपली शान राखून ठेवण्यासाठी लढायचे आहे. कारण गुजरात जिंकल्यास त्यांना गतविजतेपद टिकवून ठेवता येणार आहे तर चेन्नई जिंकल्यास त्यांना पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सशी बरोबरी करता येईल. यासाठीच आजच्या सामन्यात दोन्ही टीम भाग्यविधाता प्लेइंग ११ संघ कसा असणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.
आतापर्यंतच्या सामन्यांकडे पाहिल्यास चेन्नईच्या फलंदाजीची धुरा डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांवर असू शकते. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कॉन्वे (६२५ धावा) आणि ऋतुराज (५६४ धावा) हे अनुक्रमे चौथ्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे गुजरातच्या संघात शुबमन गिल रूपात वादळी खेळीसाठी सज्ज खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध ६० चेंडूंतच १२९ धावांची खेळी करणाऱ्या गिलने यंदाच्या हंगामात तब्बल ८५१ धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला मिळणारी ‘ऑरेंज कॅप’ त्याच्याकडेच राहणार हे निश्चित आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ कसा असेल? (CSK Playing XI Predictions)
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ११: (सलामीवीर) रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी (क) (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोईन अली, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, मथीशा पाथीराना, दीपक चहर.
इम्पॅक्ट प्लेअर: सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, अंबाती रायुडू, सिमरजीत सिंग आणि आकाश सिंग हे इम्पॅक्ट प्लेयरसाठी पर्याय असू शकतात.
गुजरात टायटन्स संघ कसा असेल? (Gujarat Titans Playing XI Predictions)
गुजरात टायटन्स प्लेइंग ११: शुभमन गिल, हार्दिक पंड्या (क), साई सुदर्शन, डीए मिलर, विजय शंकर, आर तेवतिया, ऋद्धिमान साहा (डब्ल्यू), रशीद खान, एम शमी, एमएम शर्मा, नूर अहमद
हे ही वाचा<< IPL 2023 Final च्या CSK vs GT सामन्यात पावसाची शक्यता किती? कधी, कुठे पाहाल सामना? सर्व उत्तरे एका क्लिकवर
राखीव: केन विल्यमसन, जे लिटिल, यश दयाल, अल्झारी जोसेफ, केएस भरत, ए मनोहर, जे यादव, एमएस वेड, उर्विल पटेल, रविश्रीनिवासन साई किशोर, ओडियन स्मिथ, शिवम मावी, डीजी नालकांडे, पीजे सांगवान, डी शनाका