TATA IPL 2023 Final, CSK vs GT: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 फायनल) २०२३च्या अंतिम सामन्यासाठी स्टेज तयार झाला आहे. गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मार्गावर आहे. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या मार्गात गुजरात उभा आहे. गुजरात टायटन्सने या मोसमात त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने अंतिम लढतीत जाणाऱ्या संघात आत्मविश्वास निर्माण केला आहे. जेतेपदाच्या लढतीत, आम्ही काही प्रमुख खेळाडू एकमेकांच्या बरोबरीने जाताना पाहू शकतो. अशाच काही खेळाडूंच्या हेड टू हेड लढतीवर एक नजर टाकूया.

शुबमन गिल विरुद्ध दीपक चाहर

शुबमन गिल आयपीएल २०२३मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात गिलच्या बॅटमधून तीन शतके झळकली आहेत आणि त्याच्यासमोर या लीगमध्ये मोठमोठे गोलंदाज पाणी मागताना दिसले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात २८ मे रोजी रात्री आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत सामना होणार आहे. माहीची यलो आर्मी आणि विजेतेपद यांच्यामध्ये शुबमन गिल हा सर्वात मोठा अडथळा वाटतो. अशा स्थितीत जेतेपदाच्या लढतीत सीएसके आणि कर्णधार धोनीसमोर गिलला कसे शांत ठेवता येईल आणि लवकर बाद करता येईल?हे  मोठे आव्हान असेल. संघासाठी नव्या चेंडूने हे काम करण्याची क्षमता दीपक चाहरकडे आहे.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

शुबमन गिलने आयपीएलमध्ये १६ सामन्यात ८५१ धावा केल्या आहेत. या मोसमात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. शुबमन गिलने गेल्या चार सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. गिलची रविवारी अंतिम फेरीत दीपक चाहरशी लढत होईल. चाहरविरुद्ध, शुबमनने आयपीएलमध्ये ४७ चेंडूंचा सामना केला आणि १३१.९१च्या स्ट्राइक रेटने ६२ धावा केल्या. चहरने शुबमन गिलला आठ सामन्यांत केवळ तीन वेळा बाद केले आहे. क्वालिफायरमध्ये चाहरने गिलला बाद केले.

शिवम दुबे विरुद्ध राशिद खान

शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाल्यापासून एक पॉवर हिटर म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. दुबेने या मोसमात ३३ षटकार मारले आहेत आणि सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत तो आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (३६) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, राशिदने अद्याप दुबेला आयपीएलमध्ये बाद केले नाही. राशिद आणि शिवम यांनी गोलंदाजीत विरोधी संघांच्या फलंदाजांना धावा करण्यात रोखले आहे. राशिदने या मोसमात तब्बल २७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IPL 2023 Closing Ceremony: आयपीएल समारोप समारंभात कलाकारांची असणार मांदियाळी, चाहत्यांना मिळणार रंगारंग कार्यक्रमांची खास मेजवानी

मोहम्मद शमी विरुद्ध ऋतुराज गायकवाड

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात यंगस्टर्स चमकले असून ऋतुराज गायकवाड त्यापैकीच एक आहे. गायकवाडने या मोसमात १५ सामन्यात १४६.८८च्या स्ट्राईक रेटने ५६४ धावा केल्या आहेत, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, शमीविरुद्ध गायकवाडने आयपीएलमधील सात डावांत ७०च्या स्ट्राईक रेटने केवळ ४६ धावा केल्या आहेत. नवीन चेंडूसह शमीचा फॉर्म सीएसकेचा सलामीवीर गायकवाडविरुद्ध घातक ठरू शकतो.