Richard Gleeson debuts in IPL : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२४ मध्ये एक वेगळ्या प्रकारचा विक्रम केला. चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्ध रिचर्ड ग्लीसनला मैदानात उतरवले. यासह ३६ वर्षीय रिचर्ड ग्लीसन चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या मागील १० वर्षात पदार्पण करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. रिचर्ड ग्लीसन हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आहे. ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंतला बाद करुन जागतिक स्तरावर खळबळ माजवली होती.

चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनवेच्या जागी ग्लीसनचा संघात समावेश केला. कॉनवे दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. आता चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मथिशा पाथिरानाच्या जागी रिचर्ड ग्लीसनचा समावेश करण्यात आला आहे. पाथिराना दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये. आयपीएल २०२४ च्या पर्पल कॅपच्या शर्यतीत तो १३ विकेटसह चौथ्या स्थानावर आहे. रिचर्ड ग्लीसनचे वय ३६ वर्षे ११५ दिवस आहे. आयपीएल २०१४ नंतर, सिकंदर रझा (३६ वर्षे, ३४२ दिवस) हा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने रिचर्ड ग्लीसनपेक्षा जास्त वयात आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

Nikolaas Davine made history by retired out
ENG vs NAM : टी२० वर्ल्डकपमध्ये ‘रिटायर्ड आउट’ का आलंय चर्चेत? कोण झालं अशा पद्धतीने आऊट? जाणून घ्या
Australia beat England by 36 runs in Twenty20 World Cup cricket tournament sport news
झॅम्पाची फिरकी निर्णायक; ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर ३६ धावांनी मात ; फलंदाजांचीही फटकेबाजी
Rohit Sharma Statement on New York Pitch Nassau County Internation Cricket Stadium Ahead of IND vs PAK
IND vs PAK: रोहित शर्माचे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “क्युरेटरही पिचबाबत संभ्रमात…”
Arshdeep Singh takes two wickets in one over
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात ‘सिंग इज किंग’, एकाच षटकात दोन आयरिश फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता, पाहा VIDEO
WI beat PNG By 5 Wickets
T20 WC 2024: नवख्या संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला फोडला घाम, पापुआ न्यू गिनीविरुद्ध अडखळत विजय
SRH Scores Lowest Total in IPL Finals
IPL 2024 Final: KKR च्या गोलंदाजांचा तिखट मारा अन् SRH ची सपशेल शरणागती, हैदराबादच्या नावे IPL इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Qualifier 1 Updates in Marathi
VIDEO : स्टार्कच्या भेदक चेंडूवर हेडच्या दांड्या गुल, मागे वळून पाहातच राहिला; नेमकं काय घडलं?
Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर, केशव महाराज आणि भारताचा जलज सक्सेना हे देखील अशा खेळाडूंमध्ये आहेत, ज्यांनी ३४ पेक्षा जास्त वयात पहिला आयपीएल सामना खेळला. इम्रान ताहिरने वयाच्या ३५ वर्षे ४४ दिवसांत आयपीएलमध्ये पदार्पण केले. जलज सक्सेनाने वयाच्या ३४ वर्षे १२४ दिवसांनी आयपीएलमधील पहिला सामना खेळला होता आणि केशव महाराजने ३४ वर्षे ६३ दिवस वयात आयपीएलमधील पहिला सामना खेळला होता.

हेही वाचा – VIDEO : बुमराहने पराभवानंतरही जिंकली चाहत्यांची मनं, एका खास फॅनला गिफ्ट केली पर्पल कॅप

आयपीएलमध्ये पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू (२०१४ पासून)

सिकंदर रझा – ३६ वर्षे ३४२ दिवस
रिचर्ड ग्लीसन – ३६ वर्षे १५१ दिवस
इम्रान ताहिर – ३५ वर्षे ४४ दिवस
जलज सक्सेना – ३४ वर्षे १२४ दिवस
केशव महाराज – ३४ वर्षे ६३ दिवस

हेही वाचा – VIDEO : ‘तू माझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहेस…’, रोहितने अमित मिश्राच्या वयावर उपस्थित केला प्रश्न

चेन्नईने पंजाबला दिले १६३ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे तर, चेपॉकमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ६ गडी बाद १६२ धावाच करता आल्या. पॉवरप्लेमध्ये झंझावाती सुरुवात करणाऱ्या चेन्नईला ८ ते १५ षटकांमध्ये एकही चौकार मारता आला नाही. सहा षटकांत संघाची धावसंख्या एकही विकेट न पडता ५५ धावा होती, मात्र १६ षटकांत धावसंख्या ११० च्या आसपास होता. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि २ षटकार आले. शेवटी महेंद्रसिंग धोनीने ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. या मोसमात तो पहिल्यांदाच बाद झाला.