scorecardresearch

“मुंबईचे रस्ते ‘सुपर क्लीन’ आहेत”, डेल स्टेनच्या पोस्टमुळे मुंबईकर ‘क्लिन बोल्ड’; म्हणाले “कोणत्या…”

यासाठी काहींनी श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारतमुळे हे शक्य असल्याचं म्हटलंय.

Dale Steyn
त्याचं ट्विट सध्या चर्चेत असून अनेकजण त्यावर व्यक्त होत आहेत (फाइल फोटो)

दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेनने मुंबईमधील रस्त्यांना ‘सुपर क्लीन’ असं म्हटलं आहे. हे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्यावर कचरा नसावा म्हणून फार प्रयत्न केले जात असल्याचंही स्टेनने ट्विटवरुन म्हटलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटला मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रिप्लाय करण्यात आलाय. आम्ही स्वच्छ रस्ते आणि मोकळ्या मनाने सर्वांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं बीएमसीने म्हटलंय.

“मुंबईमधील रस्ते सुपर क्लीन आहेत असं मी म्हटलं पाहिजे. रस्त्यावर कचरा दिसून नये म्हणून फार मेहनत घेतली जात असल्याचं मला इथे दिसत आहे. फारच छान,” असं स्टेटनने ट्विट केलं आहे.

“तुमच्या या चांगल्या शब्दांसाठी (कौतुकासाठी) आम्ही आभार मानतो. आम्ही नेहमीच इथे स्वच्छ रस्ते आणि मोठ्या मनाने लोकांचं स्वागत करतो. आम्हाला आमच्या स्वच्छता योद्ध्यांच्या आणि मुंबईकरांच्या मदतीने मुंबई स्वच्छ आणि हरित ठेवण्यास मदत होते,” असं बीएमसीने म्हटलं आहे.

अर्थात या फोटोखाली मुंबईकरांनी अनेक कमेंट आणि फोटोंसहीत ठिकठिकाणी असलेल्या कचऱ्याचे ढीग स्टेनला दाखवले आहेत.
१) हे पण बघ

२) साऊथ बॉम्बे पीपल

३) हॉटेल ते मैदान प्रवासात हे कळलं

५)रन वे पाहिला असशील

६) मैदान आणि हॉटेलदरम्यानचा रस्ता

७) कोणत्या भागाबद्दल बोलतोयस मुंबईतल्या?

८) मुंबई आणि स्वच्छ?

९) तू फक्त मरीन ड्राइव्ह पाहिलाय

१०) धारावी, कुर्ल्यासाठी खरं नाही पण…

काहींनी मात्र यासाठी स्वच्छ भारत मोहिमेचं तर काहींनी शहरात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचं कौतुक केलंय. यासाठी काहींनी श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारतमुळे हे शक्य असल्याचं म्हटलंय. पाहूयात कोण काय म्हणालंय…
१) स्वच्छ भारत मोहिमेमुळे

२) धन्यवाद मुख्यमंत्री…

३) बीएमसीमुळेच…

४) मोदींचं कौतुक

५) हे वाचून फार छान वाटलं

स्टेन सध्या आयपीएलनिमित्त भारत दौऱ्यावर असून सर्व सामने मुंबई आणि पुण्यात खेळवण्यात येत असल्याने सर्व समालोचक आणि प्रशिक्षक तसेच संघ मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dale steyn praises mumbai civic body for maintaining super clean streets scsg

ताज्या बातम्या