आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ६४ वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्लस या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या दोन्ही संघांना आजचा विजय गरजेचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिट्ल्स संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर गोल्डन डकवर बाद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर

आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी स्टेडियमवर सामना खेळवला जातोय. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पंजाबचा हा निर्णय सुरुवातीला योग्यदेखील ठरला. कारण लियाम लिव्हिंगस्टोनने टाकलेल्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर दिल्लीचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर झेलबाद झाला आहे. सामन्यातील पहिल्या चेंडूवर फटका मारण्याचा डेविडने प्रयत्न केला. मात्र उसळी घेत चेंडू थेट राहुल चहरच्या हातात विसावला. परिणामी दिल्लीला पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसला.

हेही वाचा >>> Prithvi Shaw Discharge : दिल्ली कॅपिट्लसचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉला मिळाला डिस्चार्ज, मैदानात कधी उतरणार?

याआधी डेविड वॉर्नससोबत फलंदाजीसाठी आलेला सरफराज खान स्ट्राईकवर होता. मात्र समोर गोलंदाजी करण्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोन आलेला पाहून डेविडने ऐनवेळी स्ट्रईक बदलली. तो नॉन स्ट्राईकवरून स्ट्रईकवर आला. मात्र त्याचा हाच निर्णय चुकीचा ठरला आणि डेविड वॉर्नर गोल्डन डकवर गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फितीबाद झाला.

हेही वाचा >>> केकेआरला मोठा धक्का! अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर

पंजाब किंग्जचे प्लेइंग इलेव्हन

जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग</p>

हेही वाचा >>>गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner golden duck out by liam livingstone in pbks vs dc ipl 2022 match prd
First published on: 16-05-2022 at 20:36 IST