scorecardresearch

Premium

DC vs KKR Cricket Score: हुश्श! अखेर जिंकलो; दिल्लीने कोलकातावर चार विकेट्सने आयपीएलमधील पहिला विजय मिळवला

IPL 2023 DC vs KKR Match Updates: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्लीने या आयपीएल हंगामातील कोलकातावर चार विकेट्सने पहिला विजय नोंदवला.

DC vs KKR Score: Delhi got its first win of this season beat Kolkata by four wickets Warner's half-century
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Score Updates: आयपीएल २०२३च्या २८व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी संपन्न झाला. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात होता. डबल हेडर सामन्यातील दुसऱ्या सामन्यात दिल्लीने कोलकाताच्या फलंदाजांची बत्ती करत आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघे १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले आहे त्याचा पाठलाग करताना दिल्लीने चार विकेट्सने हा सामना जिंकला.

आधीच दिल्लीचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये जात असून आतापर्यंतचे पाचही सामने त्यांनी गमावले होते. मात्र आजच्या सहाव्या सामन्यात त्यांनी शानदार कामगिरी करत संघाला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सृरुवत फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉने ११ चेंडूत १३ धावा करत चक्रवर्तीकरवी त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेला अष्टपैलू मिचेल मार्श फारशी काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने ९ चेंडूत २ धावा केल्या. मागील काही सामन्यात जशी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरत फलंदाजी केली होती तशीच येथे केली. त्याने ४१ चेंडूत ५७ धावा करत दमदार अर्धशतक झळकावले. मात्र चक्रवर्तीच्या फिरकी चेंडूवर पायचीत झाला. त्याने त्याच्या खेळीत ११ चौकार लगावले.

One Day World Cup 2023 Updates
World Cup 2023: हरभजन सिंगने टीम इंडियाला दिल्ला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, ‘विश्वचषक जिंकायचा असेल, तर दोन महिने…’
World Cup 2023, ENG vs NZ: Rachan Ravindra- Devon Conway's excellent Centuries New Zealand beat England by nine wickets
World Cup, ENG vs NZ: रवींद्र- कॉनवेची वादळी शतके! न्यूझीलंडपुढे माजी विश्वाविजेत्यांनी टेकले गुडघे, इंग्लंडचा नऊ विकेट्सने केला दारूण पराभव
India women's cricket team wins Gold at Asian Games 2023
IND W vs SL W, Asian Games: लहरा दो…! भारतीय महिला संघाने रचला इतिहास, श्रीलंकेवर १९ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत जिंकले सुवर्णपदक
ICC Rankings: No. 1 Team India India's dominance in all three formats of cricket Only two teams in the world managed this feat
ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम

मधल्या फळीतील मनीष पांडेने मोठा फटका मारण्याच्या नादात २१ (२३) बाद झाला. त्यानंतर आलेला इम्पॅक्ट खेळाडू अमान खान भोपळाही न फोडता बाद झाला. अष्टपैलू अक्षर पटेल यांनी प्रत्येकी आणि १९(२२) धावा करत संघाला विजय मिळवून दिला. कोलकाताकडून वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि कर्णधार नितीश राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात दिल्लीने रोमांचक विजय मिळवला.

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाची चुटकीसरशी विकेट घेत होता, तब्बल आठ वेळा बाद होणारा फलंदाज कोण?

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार वॉर्नरने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. पावसामुळे षटके कमी करण्यात आलेले नाहीत. पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरु झाला आणि त्याचेच नुकसान कोलकाताला भोगावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ २० षटकांत १२७ धावांवर गारद झाला. कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्याचबरोबर कोलकाता संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dc vs kkr score delhi got its first win of this season beat kolkata by four wickets warners half century avw

First published on: 21-04-2023 at 00:26 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×