scorecardresearch

DC vs SRH : वॉर्नर आणि पॉवेलची धडाकेबाज शतकी भागीदारी; दिल्लीचं हैदराबादसमोर २०८ धावांचं आव्हान

हैदराबादने संघात तीन तर, दिल्लीने चार बदल केले आहेत

IPL 2022 DC vs SRH Playing XI :आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आज(गुरुवार) ५० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर होत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ ९ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ ९ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.

सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने संघात तीन बदल केले आहेत तर, दिल्लीने चार बदल केले आहेत. हैदराबादकडून कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सीन अॅबॉट यांना संधी मिळाली. तर, एनरिक नोर्टजे, मनदीप सिंग, रिपल पटेल आणि खलील अहमद यांना दिल्ली संघात संधी मिळाली आहे.

मनदीप सिंग आणि डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आले. सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने गोलंदाजीची सलामी दिली आणि पाचव्या चेंडूवरच दिल्लीला पहिला धक्का बसला. मनदीप सिंग शून्यावर बाद झाला आणि मिचेल मार्श नवा फलंदाज म्हणून आला. पहिल्या षटकात दिल्लीला एकही रन काढता आला नाही आणि एकही विकेट पडली.

यानंतर ३७ धावांवर दिल्लीला दुसरा झटका बसला. शॉन अॅबॉटने मिशेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने १० धावा केल्या. संघाची धावसंख्या ४.२ षटकात २ बाद ३७ धावा होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरला साथ देण्यासाठी ऋषभ पंत आला आहे.

सलग तीन षटकार आणि चौकार मारल्यानंतर पंत बाद –

ऋषभ पंतने श्रेयस गोपालला लागोपाठ तीन षटकार ठोकले आणि पुढच्या चेंडूवर चौकार लगावला आणि मग बोल्ड झाला. त्याने २६ धावा काढल्या. यामुळे दिल्लीची धावसंख्या ९ षटकात ३ गडी बाद ८५ धावा अशी झाली होती. यानंतर रोव्हमन पॉवेल हा नवा फलंदाज म्हणून आला आहे.

वॉर्नर आणि पॉवेलची शतकी धडाकेबाज शतकी भागीदारी –

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर डेव्हीड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी शतकी भागीदारी केली, त्यामुळे दिल्लीची अंतिम धावसंख्या २० षटकांमध्ये ३ गडी बाद २०७ अशी झाली. वॉर्नर ९२ धावांवर तर पॉवेलने ६७ धावा काढून नाबाद राहिला.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ –

डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), ललित यादव, रोवमन पॉवेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे

सनरायझर्स हैदराबादचा संघ –

अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी, उमरान मलिक

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dc vs srh sunrisers hyderabad won the toss and elected to bowl first msr

ताज्या बातम्या