scorecardresearch

पहिला सामना, पहिलं षटक! चेतन सकारियाने आरॉन फिंचला केलं त्रिफळाचित

फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता संघाची सुरुवात मात्र खराब झाली. दिल्लीकडून आयपीएलच्या पंधाराव्या हंगामात पहिल्यांदाच खेळणारा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याने कोलकाताच्या आरॉन फिंचला त्रिफळाचित केलं.

CHETAN SAKARIYA
चेतन सकारिया (फोटो -iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. सुरुवातीलाच कोलकाताचे दिग्गज फलंदाज बाद झाल्यामुळे हा सामना चांगलाच चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये पहिल्यांदाच खेळणारा दिल्लीचा चेतन सकारिया गोलंदाजीमध्ये चांगलाच तळपला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात पहिल्याच षटकात आरॉन फिंचसारख्या दिग्गज फलंदाजाचा त्रिफळा उडवला आहे.

हेही वाचा >> इंग्लंड पुरुष कसोटी संघाच्या कर्णधारपदी बेन स्टोक्सची नियुक्ती

दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता संघाची सुरुवात मात्र खराब झाली. दिल्लीकडून आयपीएलच्या पंधाराव्या हंगामात पहिल्यांदाच खेळणारा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याने कोलकाताच्या आरॉन फिंचला त्रिफळाचित केलं. सकारियाच्या चेंडूचा सामना करताना गोंधळल्यामुळे अरॉन फिंच अवघ्या तीन धावा करु शकला.

हेही वाचा >> Video : गुजरात-हैदराबाद सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरनला राग अनावर, डगआऊटमध्ये…

तर चेतन सकारिया याने या हंगामातील त्याच्या पहिल्याच षटकात मोठे यश मिळवत आरॉन फिंचला तंबुत पाठवलं. आपल्या पहिल्याच षटकात त्याने स्वत:ला सिद्ध केलंय. त्यानंतर क्षेत्ररक्षणातही तो चांगलाच चमकलाय. पाचव्या षटकात कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर झेलबाद झाला. यावेळी चेतनने उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण करत अय्यरचा झेल टिपला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi capitals bowler chetan sakariya taken his first wicket of aaron finch in kkr vs dc match prd

ताज्या बातम्या