Ricky Ponting advice to Kuldeep Yadav: आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत खराब राहिली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्लीला सलग पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा धूसर आहेत. दिल्लीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

दिल्लीच्या गोलंदाजांनी आरसीबीविरुद्ध दमदार कामगिरी केली, पण फलंदाजांनी निराशा केली. अशा निराशाजनक पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी सामन्यातून सकारात्मक गोष्टी घेण्याचा सल्ला दिला. पाँटिंगने कुलदीप यादवला सांगितले की, “तुला माझी माफी मागण्याची गरज नाही आणि मला अजूनही मैदानात चांगली कामगिरी करण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे.” यावेळी सौरव गांगुलीही ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता.

रिकी पाँटिंग काय म्हणाला

पाँटिंग ड्रेसिंग रूममध्ये म्हणाला, “गोलंदाजीची कामगिरी चांगली होती. त्यांनी सुरुवातीला आम्हाला आव्हान दिले, धडाकेबाज सुरुवात केली. आमचा आत्मविश्वास आणि समर्पण वृत्ती त्या चांगल्या सुरुवातीमुळे परत आली, आम्ही मजबूत परत आलो. कुलदीप तू कुठे आहेस मित्रा? गेल्या सामन्यात निराश झाला होतास का? आहे ना?. सामन्यानंतर तू माझी माफी मागितलीस. तर मित्रा, क्रिकेटच्या मैदानात काहीही झाले तरी तू माझी किंवा कोणाचीही यापुढे माफी मागणार नाहीस. मी तुम्हाला मजबूत पुनरागमनासाठी शुभेच्छा देतो. तू चार षटकांत २३ धावांत दोन बळी घेतले. तो एक शानदार गोलंदाजीचा स्पेल होता. शाब्बास!”

पाँटिंगने आणखी एका भारतीय खेळाडूचे कौतुक केले

रिकी पाँटिंगनेही अष्टपैलू ललित यादवचे त्याच्या कसून गोलंदाजीच्या स्पेलबद्दल कौतुक केले. ललितला विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट मिळाली. पाँटिंग म्हणाला, “ललित माझ्या मते तू आज फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. एका षटकात दोन षटकार मारले नाहीतर पॉवरप्लेवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आम्ही तुला गोलंदाजी केली. तू एक चांगले काम केले.”

हेही वाचा: RCB in Green Jersey: दरवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ग्रीन जर्सी कधी आणि का घालते? जाणून घ्या त्यामागील कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२३चा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी निराशाजनक ठरला आहे. पहिले ५ सामने गमावल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफूटवर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना क्लास लावला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीविरुद्ध २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेत सलग ५ पराभवानंतर रिकी पाँटिंगचा राग अनावर झाला आणि त्याने संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवची सर्वोच्च क्लास लावली. पाँटिंगने कुलदीपला सांगितले की तू आज काय केलेस.