दिल्लीचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा १६ कोटी रुपये किंमत असलेला ऋषभ पंत संघाचा कप्तान असून त्याच्यावर दिल्लीची मदार आहे. सोबत अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्टजे, वॉर्नर, शार्दूल ठाकूर, मुस्तफिझुर रेहमान. कुलदीप यादव, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, मनदीप सिंग, रोव्हमन पॉवेल असे काही गुणी खेळाडू दिल्लीकडे आहेत. पृथ्वी शॉ व वॉर्नर डावाची सुरूवात करण्याची शक्यता आहे. केएस भारत तिसऱ्या व पंत चौथ्य क्रमांकावर येऊ शकतात. मिशेल मार्श सध्या फॉर्ममध्ये असून तो पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, चेतन सकारिया व कुलदीप यादववर दिल्लीची बॉलिंग अवलंबून असणार आहे.