MS Dhoni Dugout Reaction after Golden Duck: सोमवारी (दि. २९ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा मान चेन्नई सुपर किंग्स संघाला मिळाला. अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत अष्टपैलू रवींद्र जडेजा याने चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्याचा निकाल येण्यासाठी २० तासांपेक्षा जास्त कालावधी लागला, पण शेवटी महेंद्र सिंग धोनी याच्या संघानेच बाजी मारली. चेन्नईने गुजरातला डकवर्थ-लुईस नियमानुसार ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. मात्र, त्याआधी मोहित शर्माच्या गोलंदाजीवर धोनी बाद झाल्यानंतर त्याची डगआउटमधील रिअॅक्शन व्हायरल होत आहे.
अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा निराशा केली. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सलग दुसऱ्यांदा शून्यावर आऊट झालेल्या अंतिम सामन्यात धोनीचे लाखो चाहते आणि खुद्द माही देखील निराश झाला. कर्णधार एम.एस. धोनी फलंदाजीला येताच जवळपास १.२५ लाख क्रिकेट चाहते उत्साही दिसले, त्यांनी धोनी-धोनी नावाचा घोषणा द्यायला सुरुवात केली पण पहिल्याच चेंडूवर तो बाद होताच संपूर्ण मैदानात शांतता पसरली. क्रिकेटच्या भाषेत याला गोल्डन डक म्हणतात.
अंतिम सामन्याच्या १३व्या षटकात मोहित शर्माने धोनीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. धोनीने ताशी १३५.३ किलोमीटर वेगाने फेकलेला चेंडू थेट डेव्हिड मिलरच्या हातात गेला. आऊट झाल्यानंतर धोनीही शॉकमध्ये होता… फार कमी वेळ तो आऊट झाल्यावर रिअॅक्ट करतो…डकआऊटमध्ये बसला तेव्हाही डोकं हलवत होता. कारण, तो बाद झाल्यानंतर सामना दोलायमान स्थितीत गेला आणि त्यावेळी धोनी तिथे असण जास्त महत्वाच होतं. यावेळी त्याच्या मनात वेगवेगळ्या विचारांचे काहूर उठले होते. तो काही क्षणासाठी भावूक झाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी
विशेष म्हणजे आयपीएल २०२३ची सुरुवात गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्याने झाली. या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामनाही खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्यांनी प्रथम पात्रता फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत गुजरातचा पराभव केला. आयपीएल २०२३ मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संस्मरणीय विजय मिळवून दिला.
मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.