Sunil Gavaskar Angry: आयपीएल २०२३च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण स्टेडियम माहीच्या नावाने गुंजले. मात्र, या सर्वांमध्येच एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर, १६व्या षटकाच्या आधी धोनी अचानक स्क्वेअर लेग अंपायरकडे पोहोचला आणि त्याच्याशी बोलताना दिसतो. थोड्याच वेळात CSK चे आणखी काही खेळाडू धोनी पर्यंत पोहोचतात. सुमारे चार मिनिटे हे असेच चालते आणि मग पुन्हा सामना सुरू होतो.

धोनीने चाल खेळली का?

खरंतर धोनीला पथिरानाला १६वे ओव्हर टाकायला द्यायची होती, पण पथिराना ओव्हरच्या आधी मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर जेव्हा तो मैदानात आला तेव्हा तो गोलंदाजी करण्यास पात्र नव्हता. क्रिकेटच्या नियमांनुसार, बाहेरून आल्यानंतर खेळाडूला मैदानावर थोडा वेळ घालवावा लागला. त्यानंतरच तो गोलंदाजी करू शकला. त्यामुळे अंपायर त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखत होते.

RCB cancelled practice session and press meet
विराट कोहलीच्या जीवाला धोका, RCBने सराव सत्र केले रद्द; दहशतवादी असल्याच्या संशयावरुन ४ जण अटकेत
Arjun Tendulkar's leg injury
MI vs LSG : स्टॉइनिसला खुन्नस दाखवणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची निकोलस पूरनने केली धुलाई, VIDEO होतोय व्हायरल
Harbhajan Singh wants to see Virat Kohli as RCB captain in the next season of IPL
IPL 2024 : ‘विराटला पुढील हंगामात कर्णधार बनवण्याचा विचार करावा…’, माजी खेळाडूचा आरसीबीला सल्ला
Ramandeep Singh Violation of IPL Code of Conduct,
KKR vs MI : कोलकाताच्या स्टार खेळाडूवर BCCIची मोठी कारवाई, मॅच फीच्या तब्बल ‘इतका’ टक्के ठोठावला दंड
Suryakuymar Yadav Limping in pain while batting
IPL 2024: दुखापतीशी झुंजत सूर्या एकटाच लढला, वादळी खेळीनंतर स्वत: दिले दुखापतीचे अपडेट, ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळणार का?
irfan pathan on ms dhoni batting position
IPL 2024 : धोनीच्या फलंदाजी क्रमवारीवर इरफान पठाणने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, “कोणीतरी त्याला सांगावं की…”
Virat Kohli The First Player to Score 4000 Runs in IPL Wins
IPL 2024: रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू
Ayush Badoni getting run out in the match against Mumbai Indians
VIDEO : बॅट क्रिझच्या आत असूनही आयुष बडोनी कसा झाला धावबाद? चाहत्यांनी उपस्थित केला प्रश्न

धोनीवर गावसकर का संतापले?

मात्र, यादरम्यान धोनी अंपायरजवळ पोहोचला आणि त्याच्याशी बोलला. सुमारे चार मिनिटांनंतर अंपायरनी पथिरानाला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली. मात्र, धोनीमुळे सामना थांबल्यावर कॉमेंट्री करणारे सुनील गावसकर चांगलेच संतापलेले दिसले. ते म्हणाले की, “तुम्ही अंपायर्सचा निर्णय मान्य करता, जरी काहीवेळा प्रेशर सामन्याच्या परिस्थितीत अंपायर चुकीचे ठरवतात. सिनिअर असूनही अशी चूक करणं तुम्हाला शोभत नाही. धोनीच्या जागी जर ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान देशाचे कर्णधार असले असते तर तुम्ही काय उत्तर दिले असते. धोनी होता म्हणून पांड्या काही बोलला नाही.”  सुनील गावसकर यांच्या प्रमाणेच सोशल मीडियावरील इतर युजर्सनी धोनीच्या या वागण्यावर चाहत्यांनी अन्याय केला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: IPL 2023 Akash Madhwal: आकाश मधवालच्या आत्मविश्वासाला तोड नाही; म्हणतो, “मी जसप्रीत बुमराहचा पर्याय नाही, पण…”

१४ सिझन, १२ वेळा प्लेऑफमध्ये आणि १०व्यांदा आता थेट अंतिम फेरीचं तिकीट. हे सगळं चेन्नईचा आयपीएलमधील प्रवास सांगण्यासाठी पुरेसे आहे. पण यंदाच्या अंतिम फेरीत जाताना एक वाद झालेला पाहायला मिळाला. पहिल्या क्वालिफायरमध्ये जेव्हा धोनी अंपायरशी वाद घालताना दिसला तेव्हा नवीन वाद निर्माण झाला. हा वाद होता पथिरानाला गोलंदाजी देण्यावरून निर्माण झाला होता, ज्यावरून धोनी अंपायरशी भिडला.

गुजरात टायटन्सच्या डावातील १६व्या षटकात काय घडलं?

आयपीएल २०२३चा पहिला क्वालिफायर चेन्नईच्या मैदानावर २३ मे रोजी संध्याकाळी खेळला गेला, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. पण, धोनीने अंपायरसोबत केलेली घटना या सामन्यात गुजरातच्या डावाच्या १६ व्या षटकात घडली. त्याचे असे झाले की, माहीला गुजरातच्या डावातील १६वे षटक त्याचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाकडून टाकायचे होते. पण, मैदानावरील अंपायरनी त्याला तसे करण्यास नकार दिला. धोनीने स्क्वेअर लेग अंपायरशी याबाबत चर्चा सुरू केली. यात त्यांचे दोन-तीन सहकारीही सहभागी झाले. तोपर्यंत खेळ थांबला आणि सीएसकेचे काम होईपर्यंत हा अडथळा कायम होता.

हेही वाचा: Virat Kohli: विक्रमादित्य विराट! मेस्सी, रोनाल्डोच्या यादीत सामील होणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

क्रिकेटचा नियम काय आहे?

नियमांनुसार, जितका वेळ गोलंदाज ब्रेक घेऊन बाहेर गेलेला असतो, तेवढाच वेळ मैदानावर घालवल्यानंतरच तो पुन्हा गोलंदाजी करू शकतो. इथे धोनीमुळेच त्याचा प्लॅन साध्य झाला. सीएसकेचा कर्णधार आणि अंपायर यांच्यात वाद सुरू झाला तोपर्यंत पाथिरानाचा मैदानावरचा वेळ पूर्ण झाला होता. याचा अर्थ तो आता पुन्हा गोलंदाजी करू शकत होता, जे त्याने केले.