स्टार फलंदाज ख्रिस गेलने सांगितलं IPL 2022 मध्ये न खेळण्याचं कारण; म्हणाला, “मला योग्य सन्मान…”

पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही, याबाबतही गेलने खुलासा केलाय.

IPL 2022 चा उत्साह शिगेला पोहोचलाय. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये एक स्टार खेळाडू खेळताना दिसला नाही. या खेळाडूचं नाव म्हणजे ख्रिस गेल. ख्रिस गेलने यंदाच्या आयपीएमध्ये न खेळण्याचं कारण आणि त्याच्यासोबत झालेल्या वर्तणुकीबद्दल खुलासा केलाय.

IPL 2022 : शॉन टेट ते उमरान मलिक, जाणून घ्या आयपीएलमधील पाच सर्वात वेगवान चेंडू

यूकेच्या मिररशी बोलताना गेल म्हणाला की, “आयपीएलमध्ये मला ज्याप्रकारे वागणूक दिली गेली, त्यामुळे मी खूप निराश झालो आहे, पण मला खरंच आयपीएलमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही,” असं म्हणत गेलने आयपीएल २०२२ पासून तो वेगळा का झालाय, त्याचं कारणही त्याने सांगितलं. “गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे आयपीएल झाले, त्यादरम्यान, मला नीट वागवले गेले नाही, मला पाहिजे तसा सन्मान मिळत नाही, त्यामुळेच मी यंदाच्या आयपीएलच्या ड्राफ्टमध्ये मी माझे नाव टाकले नाही. क्रिकेटनंतरही जीवन आहे, त्यामुळे मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असं ख्रिस गेल म्हणाला.

Photos: IPL 2022 मध्ये नव्या लुकमुळे विराट कोहली चर्चेत, याआधीही अनेकदा बददली होती स्टाईल

गेलने तो आयपीएलमध्ये परत खेळताना दिसणार की नाही, याबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, ‘होय मी पुनरागमन करणार आहे, त्यांना माझी गरज आहे. मी पुढच्या वर्षी परत येईन, त्यांना माझी गरज आहे!” पुढे गेल म्हणाला, ‘मी आयपीएलमध्ये कोलकाता, आरसीबी आणि पंजाब या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मला आरसीबी आणि पंजाब संघापैकी एकाला विजेतेपद मिळवून द्यायला आवडेल. “माझा RCB सोबत काळ खूप चांगला होता, त्याच संघात असताना मी सर्वात जास्त यशस्वी झालो आणि माझं पंजाबशीही चांगलं नातं राहिलंय. मला वेळेसोबत अधिक चांगलं खेळायला आवडतं आणि मला आव्हानं आवडतात, त्यामुळे पुढे काय होईल ते पाहूयात,” असं गेलने म्हटलंय.  

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Did not get the respect i deserved says chris gayle on why he opted out of ipl 2022 hrc

Next Story
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थानचा ‘यशस्वी’ पाठलाग!
फोटो गॅलरी