रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या फाफ डू प्लेसिसने धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने बंगळुरु संघाकडून फलंदीजसाठी सलामीला येत पंजाबच्या गोलंदाजांचा झोडपून काढले आहे. त्याने ५७ चेंडूंमध्ये चक्का ८८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ७ षटकार आणि ३ चौकार लगावले असून त्याच्या या धडाकेबाज खेळाने बंगळुरुचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

फाफ डू प्लेसिस याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत होता. या हंगामात मात्र तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून खेळत आहे. त्याच्याकडे संघाचं कर्णधारपद आहे. आजच्या पहिल्याच सामन्यात त्याने पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याने ५७ चेंडूंमध्ये चक्क ८८ धावा केल्या आहेत. सहा षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या उभी केलीय. पहिल्यांदाच संघाचे कर्णधारपद भूषवत असल्यामुळे तो दडपणात खेळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र मैदानात उतरल्यानंतर कशाहीची पर्वा न करता त्यांने पंजाबच्या गोलंदाजांना झोडून काढले.

सुरुवातीला संथ गतीने खेळत असताना त्याने ३४ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या. नंतर मात्र त्याने तुफान फलंदाजी केली. प्लेसिसने ४५ चेंडूंमध्ये चक्क ६५ धावा केल्या होत्या. शेवटी मात्र अर्षदीप सिंगच्या चेंडूवर फटका मारल्यानंतर शाहरुख खानने चेंडू हवेत झेलल्यामुळे तो ८८ धावांवर झेलबाद झाला. त्याच्या या दिमाखदार खेळामुळेच बंगळुरु संघाने पंजाबसमोर तब्बल २०६ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.