Lucknow batsman run out video viral: आयपील २०२३ चा एलिमिनेटर सामना मुंबई आणि लखनऊ संघांत चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने लखनऊ ८१ धावांनी मोठा विजय मिळवत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये धडक मारली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ सलग दुसऱ्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात पराभूत झाला. मुंबईविरुद्धच्या पराभवात लखनऊच्या खेळाडूंची बालिश चूक कारणीभूत ठरली. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचे ३ खेळाडू धावबाद झाले.

इतकंच नाही तर मार्कस स्टॉइनिस चांगली फलंदाजी करत होता, तो मैदानावरच सहकारी दीपक हुडाला धडकल्याने क्रीझपर्यंत पोहोचू शकला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर चाहत्यांनी हुड्डापासून मेंटॉर गौतम गंभीरपर्यंत सर्वांना ट्रोल केले आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर मुंबईने पहिल्यांदा खेळताना १८२ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १०१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Rishabh pant hitting bat screen video viral
IPL 2024, RR vs DC : ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं, ज्याचा VIDEO होतोय व्हायरल
Russell Completes 200 Sixes In IPL
IPL 2024 : ख्रिस गेल, रोहित आणि धोनी यांनाही जे जमलं नाही ते रसेलने केलं, पहिल्याच सामन्यात नोंदवला ‘हा’ खास विक्रम

लखनऊ सुपर जायंट्सच्या खेळाडूंची धावबाद होण्याची सुरुवात १२व्या षटकापासून झाली. १२व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिस लेग साइडला शॉट खेळून २ धावांसाठी धावला. यावेळी दीपक हुडा आणि स्टॉयनिस दोघेही चेंडू पाहत होते. या दरम्यान दुसरी धाव घेताना वेळी त्यांची टक्कर झाली. यामुळे स्टॉइनिस योग्य वेळी क्रीजवर पोहोचू शकला नाही. तो उत्कृष्ट लयीत दिसत होता. स्टॉइनिसने २७ चेंडूत ४० धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ५ चौकार आणि एक षटकार मारला.

हेही वाचा – MI vs LSG: विजयानंतर मुंबईच्या ‘या’ तीन खेळाडूंनी उडवली नवीन उल हकची खिल्ली, आंब्यासोबतचा फोटो होतोय व्हायरल

गौतम आणि हुड्डाही होतायेत ट्रोल –

डावाच्या १३व्या षटकात कृष्णप्पा गौतमने पॉइंटवर कट शॉट खेळला. ३० यार्ड सर्कलच्या आत कॅमेरून ग्रीनने चेंडू पकडला आणि कव्हरवर उभा असलेला कर्णधार रोहित शर्माच्या दिशेने फेकला. दरम्यान, गौतम धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना रोहितने थेट थ्रोवर फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर १५व्या षटकात हुड्डाही धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यानंतर दीपक हुड्डाला ट्रोल केले जाऊ लागले आहे. एका चाहत्याने लिहिले की, गौतम गंभीर ड्रेसिंग रूममध्ये दीपक हुडाची वाट पाहत आहे.