IPL 2023: टीम इंडियातील स्थानाबद्दल उमेश यादवचे महत्वाचे वक्तव्य; म्हणाला,’वनडे विश्वचषक २०२३…’

Umesh Yadav Statement: उमेश यादव इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. त्याने आयपीएल २०२३ पूर्वी भारतीय संघातील स्थानाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Umesh Yadav on ODI World Cup 2023
उमेश यादव (फोटो- संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Umesh Yadav on ODI World Cup 2023: ३१ मार्चपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नावाचाही समावेश आहे. तो या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी तयारी करत आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. यबाबत स्वत: उमेश यादवने खुलासा केला आहे.

उमेश यादवने इंडिया टुडेला सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. तसेच, या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याला टीम इंडियाचा भाग व्हायचे आहे. त्याचबरोबर भारतीय वेगवान गोलंदाजाने आपल्या निवृत्तीचेही संकेत दिले आहेत.

आयपीएल २०२३ ची तयारी कशी आहे आणि पहिल्या सामन्यापूर्वी केकेआर किती तयार आहे, या प्रश्नावर उमेश यादव म्हणाला, ”आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य आहे. संघ सराव सत्राचा आनंद घेत आहे. पंडित सर (मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित) आमच्यासोबत कॅम्प लावत आहेत. प्रत्येकजण केंद्रित आहे आणि प्रत्येकाचे ध्येय समान आहे. हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.”

हेही वाचा – IPL 2023: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबद्दल रोहित शर्माच मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘माही अजून…’

या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कपमध्ये खेळणे साशंक आहे. अशा परिस्थितीत उमेश यादवसाठी आयपीएल २०२३ किती महत्त्वाचे आहे, असे विचारले असता, भारतीय वेगवान गोलंदाज म्हणाला, “होय, ही गोष्ट माझ्या मनात सुरू आहे. विश्वचषक ४ वर्षांतून एकदा येतो. मला वाटते की हा माझा शेवटचा विश्वचषक असेल.”

उमेश यादवला विश्वचषक संघात निवड होण्याची आशा –

उमेश यादव म्हणाला, “जसप्रीत बुमराह विश्वचषकापूर्वी फिट होऊ शकतो. या आयपीएलमध्ये मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. मला आशा आहे की मी विश्वचषक संघाचा भाग होऊ शकेन. मला पुढील ४ वर्षे वाट पाहण्याऐवजी, मी टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून २०२३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकणार नाही. अशा स्थितीत भारताची वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करू शकता का? या प्रश्नावर उमेश यादव म्हणाला, “मी हे सांगू शकत नाही. सर्वप्रथम मला आयपीएलवर लक्ष केंद्रित करायचे आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:38 IST
Next Story
IPL 2023: धोनीच्या आयपीएल निवृत्तीबद्दल रोहित शर्माच मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘माही अजून…’
Exit mobile version