आयपीएलचा पंधरावा हंगामा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित लढती अजूनही चुरशीच्या होत आहेत. दरम्यान, मुंबई आणि चेन्नई या संघामधील सामना चांगलाच चर्चेचा विषय ठरला. कारण या सामन्यात धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नईचा पराभव झाला. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने या संघाची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

मुंबईविरोधातील सामन्यामध्ये चेन्नईचा पराभव झाल्यानंतर युवराज सिंगचा एक खास व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. त्याने चेन्नईची संघाची आणि यापूर्वी चेन्नई संघाचा भाग असलेला सुरेश रैना याचीदेखील फिरकी घेतली. युवराज सिंगने रैनाला “आज तुमचा संघ अवघ्या ९७ धावांवर बाद झाला आहे, तुमचं काय मत आहे?” असं मिश्किलपणे विचारलं. युवराजच्या या प्रश्नाचे सुरेश रैनानेही मिश्किलपणे उत्तर दिले. “मी त्या सामन्यात खेळलो नाहीये,” असं म्हणत रैनालाही हसू फुटलं. या दोघांचीही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा >> कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर

दरम्यान, आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत सर्वात यशस्वी राहिलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता आठ संघांमध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या संघर्ष सुरु आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई किंवा चेन्नई या संघाशिवाय प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत.