आपयीएलच्या पंधाराव्या हंगामातील सामने चांगलेच रोमहर्षक ठऱत आहेत. सर्वच संघामध्ये मुरलेले खेळाडू असल्यामुळे सामन्यादरम्यान मोठी फटकेबाजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

एबी डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून अनेक सामने खेळला असून त्याला विराट कोहलीचा खेळ माहिती आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ यावेळी कसा खेळ खेळणार तसेच विराट कोहली काय करु शकतो, याबाबत डिव्हिलियर्सने सविस्तर सांगितले आहे. “यावेळी आरसीबीचे कर्णधारपद फाफ डू प्लेसिसकडे आहे. त्यामुळे विराटकडे संघाजी जबाबदारी नसल्यामुळे तो मोकळ्या हाताने खेळू शकतो. त्याच्या डोक्यावर तणावाचे प्रमाण कमी असेल. त्यामुळे या हंगामात विराट कोहली चांगला खेळ करेल अशी मला अपेक्षा आहे. मला वाटतं विराट यावेळी ६०० पेक्षा जास्त धावा करेल,” असे डिव्हिलियर्स म्हणाला.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, कॅप्टन्सीबद्दल बोलताना म्हणाला “अर्थातच माही भाई…”
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: “अरे त्याला श्वास तर घेऊ दे”, तिखट गोलंदाजी करणाऱ्या जड्डूला विराटची विनंती; Video तुफान व्हायरल!

तसेच पुढे बोलताना त्याने आरसीबीचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसविषयी भाष्य केलं आहे. “कोहलीचे डू प्लेसिसला मार्गदर्शन लाभेल. फाफलाही चांगला अनुभव आहे. फाफ डू प्लेलिसला चांगली टीम मिळाली आहे. त्यामुळे तो विराट तसेच इतर तरुण खेळाडूंना त्यांच्या मनासारखे खेळण्यास परवानगी देईल. या हंगामामध्ये नेमके काय होणार हे मी सांगू शकत नाही. पण यावेळी आरसीबीचे काही खेळाडू नक्कीच चमकदार कामगिरी करणार आहेत,” असेही डिव्हिलियर्स म्हणाला.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात विराटने ४१ धावा केल्या. त्यामुळे त्याने चांगल्या प्रकारे सुरुवात केल्यामुळे या हंगामात विराट आणखी चांगला खेळ करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.