scorecardresearch

Premium

Ravindra Jadeja, IPL 2023: पतीचा पाय पडण्यापासून ते मिठी मारण्यापर्यंत, रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबाच्या केमिस्ट्रीचा भावनिक Video व्हायरल

Rivaba Jadeja Video: चेन्नईने पाचवे आयपीएल जेतेपद पटकावल्यानंतर रवींद्र जडेजाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सीएसकेच्या विजयानंतर रिवाबाने रवींद्र जडेजाचा खाली वाकून पाय पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ravindra Jadeja, IPL 2023: First cried then touched husband Ravindra Jadeja's feet Rivaba's most emotional video after victory
सीएसकेच्या विजयानंतर रिवाबाने रवींद्र जडेजाचा वाकून पाय पडला. सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

Ravindra Jadeja-Rivaba Jadeja, IPL 2023: चेन्नईने पाचवे आयपीएल जेतेपद पटकावल्यानंतर रवींद्र जडेजाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सीएसकेचा विजय जडेजाच्या नावावर होता. वास्तविक, चेन्नईला गुजरातवर विजय मिळवण्यासाठी शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज होती, विजय अशक्य वाटत होता. अशा स्थितीत जडेजाने आपली सर्व शक्ती आणि अनुभव पणाला लावून शेवटच्या चेंडूवर एक षटकार आणि नंतर एक चौकार मारून रोमहर्षक विजय मिळवून दिला. एम.एस. धोनीनेही जडेजाला आपल्या खांद्यावर उचलून घेतले. चेन्नईला विजय मिळवून दिल्यानंतर जडेजाची पत्नी रिवाबाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. रिवाबाने रवींद्र जडेजाचा खाली वाकून पाय पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रिवाबाच्या संस्काराने जिंकली सर्वांची मने

रिवाबा जडेजा अहमदाबादमध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी पोहचली होती. माहितीसाठी की ती भाजपची आमदार देखील आहेत आणि त्यामुळे ती खूप व्यस्त असते. खरं तर, चेन्नईच्या विजयानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जडेजा पत्नी रिवाबाला मिठी मारताना दिसत होता. काही वेळाने आणखी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये रिवाबा रवींद्र जडेजाचे पाय पडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी रिवाबाचे खूप कौतुक केले आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. जडेजा आणि रिवाबाने सामन्यानंतर ट्रॉफीसोबत फोटोही क्लिक केला. चेन्नई सुपर किंग्जने हे ट्वीट केले आहे.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

इतकंच नाही तर विजयानंतर रिवाबा आपल्या पतीचे अभिनंदन करण्यासाठी मैदानावर पोहोचली तेव्हा तिने जडेजाला वाकून नमस्कार केला आणि नंतर मिठी मारली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी रिवाबा खूपच भावूक दिसली. आयपीएलच्या या मोसमात ती अनेकदा स्टेडियममध्ये पाठिंबा देण्यासाठी दिसली. फायनलच्या शेवटच्या षटकात सामना ज्या प्रकारे रोमांचक झाला होता. रिवाबाच्या चेहऱ्यावर त्याचा ताण स्पष्ट दिसत होता, पण जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून प्रत्येक चाहत्याला त्याच्यासोबत सेलिब्रेशन करण्याची संधी दिली.

हेही वाचा: IPL2023: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल २०२३ मध्ये किती कमाई केली? ‘इतका’ आहे त्याचा पगार, जाणून घ्या

विजयानंतर जडेजासाठी हा भावनिक क्षण होता

जडेजासाठीही हा खूप भावनिक क्षण होता, कारण काही दिवसांपूर्वी त्याने हसत हसत आपली व्यथा सांगितली होती, ज्यामुळे महेंद्रसिंग धोनी नकळत त्याच्यावर नाराज झाला होता. खरंतर प्रत्येकजण आयपीएलचा हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन मानत होता. अशा परिस्थितीत धोनीला मैदानावर जास्तीत जास्त वेळ क्रीझवर पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. यासाठी चाहते जडेजाच्या बाद झाल्यानंतर नेहमीच सेलिब्रेशनही करायचे, कारण जडेजा आऊट झाल्यावरच धोनी क्रीजवर यायचा. मात्र, शेवटच्या सामन्यात जडेजाचे चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 11:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×