Krishnappa Gowtham Smashes Six On last Ball : लखनऊ सुपर जायंट्सच्या केली मेयर्सच्या ७३ धावांच्या वादळी अर्धशतकानंतर मार्क वुडने १४ धावा देत ५ विकेट्स घेण्याची कमाल केली. या दोन्ही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळं लखनऊने दिल्लीचा ५० धावांनी पराभव करत सामना खिशात घातला. पण या सामन्यात असं काही घडलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे आणि या नियमाचा लखनऊच्या संघाने योग्यवेळी वापर केल्याचं काल झालेल्या सामन्यात पाहायला मिळालं. गौतम गंभीरच्या निर्णयानंतर लखनऊसाठी शेवटचा चेंडू खेळण्यास कृष्णप्पा गौतम मैदानात उतरला अन् गड्यानं थेट षटकारच ठोकला.

लखनऊची फलंदाजी सुरु असताना २० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आयुष बडोनी बाद झाला. बडोनी बाद झाल्यानंतर लखनऊच्या टीमने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून कृष्णप्पा गौतमला मैदानात उतरवलं. त्यानंतर त्याने साकरियाच्या गोलंदाजीच्या शेवटच्या चेंडूवर थेट षटकार मारला. गौतमला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळायला पाठवण्याची लखनऊच्या टीम मॅनेजमेंटची रणनिती यशस्वी झाली. लखनऊने २० षटकांत ६ विकेट्स गमावत १९३ धावा कुटल्या. गौतमने षटकार ठोकताच डगआऊटमध्ये बसलेल्या लखनऊच्या संघाचा टीम मेंटॉर गौतम गंभीर खूश झाला. डगआऊट मध्ये गंभीरे टाळ्यांचा गजर वाजवला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: तिलक वर्माचा जबरदस्त शॉट स्पायडर कॅमवर जाऊनच आदळला, पण फटका बसला हर्षल पटेलला
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: १४० किमीचा वेगवान चेंडू अन् २५ सेकंदात स्टंपिंग, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर क्लासेनने धवनला केलं आऊट, VIDEO
Romario Shephard Hits 32 Runs in 20th Over MI vs DC IPL 2024
IPL 2024: ४,६,६,६,४,६ रोमारियो शेफर्डची वानखेडेवर वादळी खेळी, २० व्या षटकात कुटल्या विक्रमी ३२ धावा

नक्की वाचा – केली मेयर्सची अक्षर पटेलने ‘केली’ दांडी गुल; धावांचा झंझावात थांबवला, फिरकीला पाहून फलंदाजही झाला थक्क, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

तसंच चाहत्यांनाही गंभीर आणि राहुलच्या रणनितीचं सोशल मीडियावर कौतुक केलं. क्रिकेट चाहत्यांनी मास्टरमाइंड बोलत त्यांच्या या रणनितीवर प्रतिक्रिया दिली. गंभीर आणि राहुलच्या या कृतीने क्रिकेट चाहत्यांचं हृदय जिंकलं. कृष्णप्पा गौतमने टी-२० क्रिकेटमध्ये षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. अशातच गौतम गंभीरने चालाखीने रणनिती आखत कृष्णप्पाला शेवटचा चेंडू खेळायला पाठवले. ज्यानंतर मैदानात एकच रोमांच पाहायला मिळाला. कृष्णप्पाने त्याच्या टी-२० करिअरमध्ये आतापर्यंत ३५ षटकार ठोकले आहेत.