scorecardresearch

IPL 2023: गोविंदाचा जावई शाहरुख खानच्या केकेआर संघाचे नशीब चमकवणार! जाणून घ्या कोण आहे ‘तो’ क्रिकेटर?

IPL 2023 KKR Team: केकेआर संघ १ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यात केकेआर संघाची धुरा नवीन कर्णधाराच्या खांद्यावर असणार आहे.

Nitish Rana will lead Shah Rukh Khan's KKR team
केकेआर टीम (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस(

Indian Premier League 2023: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने सोमवारी आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. केकेआरने डावखुरा फलंदाज नितीश राणाला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. राणा श्रेयस अय्यरची जागी संघाची धुरा सांभाळेल. कारण श्रेयस अय्यकरच्या पाठीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो संपूर्ण हंगामासाठी मुकणार आहे. नितीश राणाने भारतासाठी एक वनडे आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो.

नितीश राणा अभिनेता गोविंदाचा जावई आहे –

शाहरुख खानच्या टीमचा नवा कर्णधार नितीश राणा हा अभिनेता गोविंदाचा जावई आहे. काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये त्याने स्वतः याचा खुलासा केला होता. गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने कपिलच्या शोमध्ये सांगितले होते की, नितीशची पत्नी सांची मारवाह त्याची चुलत बहीण आहे. अशा पद्धतीने नितीश राणा त्यांचा मेहुणा आहे. गोविंदाची भाची सांची मारवाह हिचा नवरा असल्याने नितीश राणा त्याचा नात्याने जावई आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना मिळाली ओळख –

नितीश राणाने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१७ च्या हंगामात, मुंबईने त्याला वारंवार संधी दिली आणि नितीशने मधल्या फळीत १२ डावात ३३३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये अनेक मॅचविनिंग इनिंगचाही समावेश होता. आयपीएल २०१८ च्या लिलावात केकेआरने त्याला ३.४ कोटींमध्ये विकत घेतले. २०२२ च्या लिलावात केकेआरने त्याला विकत घेण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले होते. आतापर्यंत आयपीएलच्या ९१ सामन्यांमध्ये राणाने २७.९६ च्या सरासरीने आणि १३४ च्या स्ट्राइक रेटने २१८१ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2023: गेलचा पहिल्या आयपीएल शतकाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘या’ खेळाडूने केली होती मदत

अलीकडचा फॉर्म चांगला नाही –

नितीश राणाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे. मात्र या रणजी मोसमातील खराब कामगिरीमुळे त्याला दिल्ली संघातून वगळण्यात आले होते. राणाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १२ टी-२० सामन्यांमध्ये दिल्लीचे कर्णधारपद भूषवले आहे.त्यापैरी आठ जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. केकेआर संघ १ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

आयपीएल २०२३ साठी केकेआर संघ:

श्रेयस अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगताप, नारायण वायदे, हर्षित राणा. अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, साकिब अल हसन.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या