Gujarat Titans break CSK’s 9 year old record: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६२ धावांनी पराभव केला. गुजरातसाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गुजरातकडून शुबमन गिलने झंझावाती फलंदाजी करताना १२९ धावांची खेळी केली. त्याचवेळी मोहित शर्माने ५ विकेट घेतल्या. या खेळाडूंमुळेच गुजरात संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारता आली. फायनलमध्ये प्रवेश करताच गुजरात संघाने अनेक मोठे विक्रम केले. त्याबद्दल जाणून घेऊया.

फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली –

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २३३ धावांची मोठी मजल मारली. गुजरातकडून शुबमन गिल (१२९ धावा), साई सुदर्शन (४३ धावा), हार्दिक पांड्या (२८ धावा), राशिद खान (५ धावा) यांनी धावा केल्या. या खेळाडूंमुळेच गुजरात संघाला डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. आयपीएल प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर २०१४ साली होता. त्याच वेळी, आयपीएल प्लेऑफमध्ये सीएसकेची सर्वोत्तम धावसंख्या २२२ धावा आहे. आता प्लेऑफमध्ये गुजरातने २३३ धावा करून सीएसकेला मागे टाकले आहे.

Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड
IPL 2024 Chennai Super Kings vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs GT Highlights: चेन्नईचा गुजरातवर एकतर्फी विजय, सांघिक कामगिरीच्या बळावर ६३ धावांनी केली मात

आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ –

१. गुजरात टायटन्स – २३३ धावा, वर्ष २०२३
२. पंजाब किंग्ज – २२६ धावा, वर्ष २०१४
३. चेन्नई सुपर किंग्ज – २२२ धावा, वर्ष २०१२

हेही वाचा – MI vs GT: शुबमनने वादळी शतकानंतर सचिनशी साधला संवाद, दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सीएसके-एमआयची बरोबरी केली –

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ चे विजेतेपद पटकावले. त्याच वेळी, संघाने आता आयपीएल २०२३ च्या फायनलमध्येही प्रवेश केला आहे. सलग दोनदा फायनलमध्ये पोहोचणारा गुजरात हा तिसरा संघ ठरला आहे. गुजरातने मुंबई इंडियन्स आणि सीएसकेची बरोबरी केली आहे. सीएसकेने २०१०, २०११ आणि मुंबईने २०१९ आणि २०२० मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

हेही वाचा – MI vs GT: मोहम्मद शमीने ट्रेंट बोल्टला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

गुजरातने मुंबईवर मिळवला विजय –

गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २३३ धावा केल्या, ज्यात शुबमन गिलने शानदार १२९ धावा केल्या. त्याच्यामुळेच गुजरातचा संघ मोठी धावसंख्या करू शकला. त्याचवेळी मुंबई इंडियन्सकडून केवळ तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाच चांगली खेळी करता आली. सूर्यकुमारने ६१ आणि तिलक वर्माने ४२ धावांचे योगदान दिले, मात्र या दोन फलंदाजांशिवाय अन्य कोणीही चांगली खेळी करू शकले नाही. याच कारणामुळे मुंबईला ६२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.