GT win by 3 wickets against PBKS : आयपीएल २०२४ मधील ३७ वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला.महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात गुजरातने पंजाबचा ३ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १४३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे गुजरात टायटन्सने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर १४७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. गुजरातसाठी राहुल तेवतीयाने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा करत विजयात सर्वाधिक धावांचे योगदान दिले.

गुजरातने मागील पराभवाचा घेतला बदला –

या विजयासह गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर आता त्यांत्या खात्यात ८ गुण झाले असून सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जची चार गुणांसह नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. गुजरातच्या या विजयात राहुल तेवतियाचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने ३६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने या खेळी दरम्यान १८ चेंडूचा सामना करताना ७ चौकार मारले.

pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का
RR vs RCB Highlights IPL 2024 Eliminator Match Updates in Marathi
RR vs RCB Highlights, IPL 2024 Eliminator : ट्रॉफी जिंकण्याचं आरसीबीच्या पुरुष संघाचं स्वप्न यंदाही भंगलं, राजस्थान विजयासह क्वालिफायर-२ मध्ये दाखल
Riyan Parag complete 500 runs in IPL 2024
RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील
CSK vs RR Match Updates Match Updates in Marathi
CSK vs RR : विजयासह चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम, राजस्थान रॉयल्सचा सलग तिसरा पराभव
MS Dhoni completes 250 sixes in IPL
GT vs CSK : धोनीने डिव्हिलियर्सच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये झाला सामील
Shubman Gill scored the fourth while Sai Sudarshan scored his first IPL century
GT vs CSK : गिल-सुदर्शनच्या शतकांसह गुजरातचा चेन्नईवर विजय; प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर
CKS beat PBKS by 28 runs Chennai Super Kings Bowlers Made Team Win
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सने १११५ दिवसांनी पंजाबवर मिळवला विजय, सीएसकेच्या गोलंदाजांची कमाल
Chennai Super Kings vs Punjab Kings Match Updates in Marathi
CSK vs PBKS : पंजाब किंग्जचा ७ विकेट्सनी दणदणीत विजय, पराभवाच्या धक्क्याने चेन्नई सुपर किंग्जची वाढली डोकेदुखी

पंजाबने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. साहा आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी झाली. अर्शदीप सिंगने संघाला पहिला धक्का दिला. त्याने साहाला बाद केले. तो १३ धावा करण्यात यशस्वी झाला. तर गिल ३५ धावा करून परतला. या सामन्यात साई सुदर्शनने ३१ धावा केल्या. तर डेव्हिड मिलर चार धावा, अजमतुल्ला उमरझाई १३ धावा आणि शाहरुख खान तीन धावा करून बाद झाला. साई किशोर खाते न उघडता नाबाद राहिला. पंजाबकडून हर्षल पटेलने तीन तर लियाम लिव्हिंगस्टोनने दोन गडी बाद केले. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – IPL 2024 : ‘ज्या संघांनी पार्ट्या केल्या त्यांनी अजून आयपीएल जिंकली नाही’, सुरेश रैनाने नाव घेता ‘या’ संघांना डिवचले

राहुल तेवतिया हा गेम चेंजर ठरला –

गुजरात टायटन्स संघ अडचणीत आला होता, त्यावेळी सहाव्या क्रमांकावर राहुल तेवतिया फलंदाजीला आला. त्याने सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि डावाच्या १८ व्या षटकात ३ चौकार आणि एका षटकारासह २० धावा करून सामना आपल्या बाजून वळवला. तेवतियाने कठीण परिस्थितीत १८ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून विजय निश्चित केला.