जोराचा फटका मारताना पांड्याच्या हातातून निसटली बॅट, पंच बालंबाल बचावला, पाहा नेमकं काय घडलं?

शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आला होता.

HARDIK PANDYA BAT
हार्दिक पांड्याच्या हातातून बॅट निसटली (iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६७ व्या सामन्यात बंगळुरु आणि राजस्थान यांच्यात लढत झाली. गुजरात संघाने सुरुवातीला फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा संघ २० षटकांपर्यंत १६८ धावा करु शकला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने तर आपली भूमिका चोख बाजावत ६२ धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान, हार्दिक पटेल फलंदाजी करत असताना एक अनपेक्षित घटना घडली. त्याच्या हातातून बॅट निसटली.

हेही वाचा >> अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक

शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आला. त्याने सुरुवातीपासून वेळ मिळेल तेव्हा मोठे फटके मारत गुजरातचा धावफलक खेळता ठेवण्याचा प्रयत्न केला. गुजरातच्या ७२ धावा झालेल्या असताना हार्दिकने गुडघ्यावर बसून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातातून बॅट निसटली. विशेष म्हणजे ही बॅट थेट हवेत उंच गेली. बॅट जेथ पडली त्याच्या काही अंतरावरच पंच उभा होता. बॅट आणखी थोडी दूर केली असती तर पंच जखमी झाले असता. मात्र ते बचावले.

हेही वाचा >> हेल्मेट फेकले, बॅटही आपटली; बाद होताच मॅथ्यू वेड झाला लालबूंद, पाहा व्हिडीओ

दरम्यान, या सामन्यात हार्दिक पांड्याने दमदार खेळी केली. त्याने ४७ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद ६२ धावा केल्या. गुजरातने बंघळुरुसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले. हार्दिक पांड्यासोबतच डेविड मिलर यानेदेखील ३४ धावा करत पांड्याला साथ दिली. मात्र या सामन्यात बंगळुरु संघाचा आठ गडी राखून विजय झाला. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केल्यामुळे बंगळुरुा विजय मिळवता आला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hardik pandya bat slip out of his hand in rcb vs gt match video went viral prd

Next Story
गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी