scorecardresearch

सामन्यात हार्दिक पांड्याचा त्रागा, मोहम्मद शमीवर ऑन कॅमेरा चिडला, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

गुजरातने चागंगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत हैदराबादला रोखून धरण्याचा प्रयत्न केला

hardik pandya and mohammed shami
हार्दिक पांड्या मोहम्मद शमीवर रागावला (फोटो ट्विटरवरून साभार)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २१ वा सामना अनेक कारणांनी स्मरणात राहिला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने गुजरातचा विजयी रथाला रोखून सामना जिंकला. या सामन्यात गुजरातने विजयासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र हैदराबादने गुजरातची डाळ शिजू दिली नाही. दरम्यान, या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने केलेला त्रागा आणि संघातील अनुभवी आणि दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीवर पांड्याने काढलेला राग सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.

हेही वाचा >>> संघाचा सामन्यात पराभव पण हार्दिक पांड्या चमकला, दिग्गजांना मागे टाकत नोंदवला ‘हा’ विक्रम

गुजरात टायटन्सने फलंदाजीला उतरत हैदराबादसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावसंख्या मोठी नसल्यामुळे गुजरातने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत हैदराबादला रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र हैदराबादच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून धडाकेबाज खेळी केली. हैदराबाद ९७ धावा आणि एक गडी बाद अशा भक्कम स्थितीत होता. तर दुसरीकडे सामना जिंकायचा असेल तर विकेटची गरज असल्यामुळे गुजरात संघ धडपडत होता. याच वेळी हार्दिक पांड्या गोलंदाजी करत असताना हैदराबादच्या फलंदाजाने थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मारला. चेंडू हवेत असल्यामुळे मोहम्मद शमीला झेल टिपता आला असता. मात्र मागे उभा असलेल्या मोहम्मद शमीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने चौकार मिळू नये म्हणून चेंडू पकडला.

हेही वाचा >>> IPL 2022 : चेन्नईला मोठा धक्का ! १४ कोटीचा दीपक चहर IPL मधून बाहेर ?

याच कारणामुळे भारतीय संघात मोठी कामगिरी करणाऱ्या अणि जास्त अनुभव असलेल्या शमीला हार्दिक पांड्या रागवला. झेल टिपण्यासाठी प्रयत्न का केला नाही म्हणत मोहम्मद शमीवर पांड्याने राग काढला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. फक्त कर्णधार असल्यामुळे एखाद्या अनुभवी खेळाडूला अशी वागणूक देणे चुकीचे असल्याचे क्रिकेटचे चाहते म्हणत आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hardik pandya yelled at mohammed shami in gt vs srh ipl 2022 match prd