Net Bowlers Fees Updates: प्रीमियर लीग (IPL) २०२३ चा हंगाम ३१ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स (GT) आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. गुजरात संघाचा हा केवळ दुसरा हंगाम असून त्याचे कर्णधारपद स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. आयपीएलसाठी सर्व संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यासोबतच त्यांच्या घरच्या मैदानावर प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात फलंदाजांना सराव देण्यासाठी नेट गोलंदाजांना पाचारण केले जाते. भारतासह इतर आंतरराष्ट्रीय संघही त्यांच्या तयारीसाठी नेट गोलंदाजांना बोलावतात. बहुतेक नेट बॉलर्स विनामूल्य सर्व्हिस देतात - आयपीएलमध्ये खेळाडूंना किती मानधन मिळते, हे लिलाव आणि कराराद्वारे ठरवले जाते. यासोबतच चाहत्यांसमोर सर्व काही उघड असते. पण नेट बॉलर्सना किती फी मिळते हे आजवर क्वचितच कुणाला माहीत असेल. म्हटलं तर नेट बॉलर्सना काही मिळत नाही. जर ते आपली सेवा विनामूल्य देतात म्हणले, तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही म्हणाल की खेळाडू आणि कर्मचाऱ्यांवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या फ्रँचायझी नेट बॉलर्सना फुकट का ठेवतात? हेही वाचा - IPL 2023: अखेर प्रतिक्षा संपली! चेन्नई सुपर किंग्जने लॉन्च केली नवी जर्सी; धोनी, अजिंक्य रहाणेसह सर्व खेळाडू होते उपस्थित कोरोनाच्या काळात लाखो रुपये मिळायचे - होय. हे बरोबर आहे. कोरोनापूर्वी नेट बॉलर्सना मोफत ठेवले जात होते. मग ते टीम इंडियाचे असो किंवा आयपीएल संघांचे. पण कोरोनादरम्यानच्या प्रोटोकॉलमुळे संपूर्ण हंगामात नेट बॉलर्सना बायो-बबलमध्ये ठेवावे लागले. त्यांना सोबत घेऊन जावे लागले. यामुळेच कोरोनाच्या वेळी नेट बॉलर्सनाही एका हंगामासाठी सुमारे ५ लाख रुपये दिले जात होते. राहण्या-खाण्याचा खर्चही करायचे.पण कोरोनानंतर पुन्हा एकदा नेट बॉलर्सना फुकट ठेवण्याची परंपरा सुरू झाली आहे. संघ कोणत्याही शहरात सामना खेळायला गेला, तरी स्थानिक नेट गोलंदाजांची वाट पाहिली जाते. अशा परिस्थितीत नेट बॉलर्सना सोबत ठेवण्याचा आणि त्त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि हॉटेलचा खर्च उचलण्याची गरज लागत नाही. मग नेट बॉलर्संना फायदा काय? पण एका देशांतर्गत क्रिकेटपटूशी आज तक वृत्तसंशस्थेने संवाद साधल्याच्या माहितीनुसार नेट बॉलर्सनाही ठेवण्यासाठी काही नियम आहेत. जर फ्रँचायझीला विशिष्ट नेट बॉलरची गरज असेल आणि त्याला फ्रँचायझी किंवा टीम मॅनेजमेंटने स्पेशल म्हटले, तर त्या नेट बॉलरला दररोज सुमारे ७,००० रुपये दिले जातात. या परिस्थितीत, नेट बॉलरसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे फ्रँचायझी आहारापासून ग्रूमिंगपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेते. त्या तरुण नेट बॉलरला फ्रँचायझीमध्ये सामील झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळते. त्याला स्टार खेळाडूसमोर गोलंदाजी करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर गोलंदाजी प्रशिक्षकाकडून त्याला खूप काही शिकायला मिळते. त्याच्या उणिवांवर काम करण्याची संधी मिळते. हेही वाचा - IPL 2023: ‘…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोहित खेळणार नाही’; त्याच्या गैरहजेरीत सूर्या सांभाळणार मुंबईची धुरा नेट बॉलरला संघासाठी खेळण्याच्या संधी निर्माण होतात - एखाद्या क्रीडा अकादमीने आपल्या वतीने नेट गोलंदाजांची व्यवस्था केली किंवा एखादा खेळाडू स्वत: नेट गोलंदाज बनला, तर त्याला मोबदला दिला जात नाही. हे का केले जाते, जेणेकरून खेळाडू नेट बॉलर बनून आपली प्रतिभा दाखवू शकेल. त्यामुळे त्याला आणखी संधी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. याचे उदाहरण म्हणजे उमरान मलिक. उमरानने नेट बॉलर म्हणून सनरायझर्स हैदराबाद संघात स्थान मिळवले आणि त्यानंतर टीम इंडियासाठीही पदार्पण केले.