आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील अंतिम लढत आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. गुजरात टायटन्सने पदार्पणातच फायनलपर्यंत धडक मारली आहे. तर राजस्थान रॉयल्स पुन्हा विजय मिळवण्यासाठी संघर्ष करणार आहे. याआधी राजस्थानने आयपीएलच्या पहिल्या पर्वात म्हणजेच आयपीएल २००८ मध्ये ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. त्यावेळी शेन वॉर्नने राजस्थान संघाचे नेतृत्व केले होते. आजदेखील राजस्थान संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला असून या निमित्ताने शेन वॉर्नने खेळाडू निवडीच्या मुद्द्यावरुन आयपीएल स्पर्धा सोडून जाण्याची कशा प्रकारे धमकी दिली होती, याबद्दलचा किस्सा सध्या चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Tata IPL Final 2022 GT vs RR : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर होणार अंतिम लढत, जाणून घ्या मैदानाची वैशिष्ट्ये

शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. वॉर्नने राजस्थान रॉयल्सला २००८ साली ट्रॉफी मिळवून दिली होती. यावेळी त्याने खेळाडू निवडीवरुन संघ मालक मनोज बदाले यांच्याशी चांगलाच वाद घातला होता. वॉर्नने त्याचे आत्मचरित्र नो स्पिनमध्ये याबद्दल सांगितले आहे. २००८ च्या आयपील हंगामात राजस्थान संघाकडून खेळणारे रविंद्र जाडेजा आणि स्वप्निल असनोडकर यांनी चांगला खेळ करुन दाखवला होता. मात्र शेन वॉर्नने १६ खेळाडू असलेल्या संघात बदल करावा असे मत मनोज बादले यांचे होते. वॉर्नने असिफ नावाच्या खेळाडूला संघात स्थान द्यावे असे बादले यांचे मत होते. मात्र वॉर्नला असिफ नावाचा खेळाडू प्रभावित करु शकला नाही. परिणामी त्याला संघात स्थान देण्यास वॉर्नने कठोर विरोध दर्शविला. एवढेच नव्हे तर संघात बदल करायचा असेल तर मी तुमचे पैसे परत करतो आणि निघून जातो, असे म्हणत शेन वॉर्नने बादले यांना सांगितले होते.

हेही वाचा >>> ‘जोसभाईने ८०० केल्या, मी असतो तर १६०० धावा कुटून आलो असतो,’ RR च्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा

“मी आसिफचा संघात समावेश केला तर तो पात्र नाही हे समजेल. तसेच संघात पक्षपातीपणा असल्यामुळे असे करण्यात आले आहे, असा संदेश जाईल. त्यामुळे बाकीच्या खेळाडूंचा माझ्यावरील विश्वास उडेल. तुम्हाला असिफला संघात स्थान द्यायचे असेल, तर ठीक आहे, मी तुमचे पैसे परत करतो. मी संघाचा भाग नसेल,” असे शेन वॉर्न मनोज बादले यांना म्हणाला होता. वॉर्नच्या या भूमिकेमुळे बादले यांनी आपली भूमिका बदलली आणि शेन वॉर्नच्या म्हणण्याप्रमाणे संघनिवड झाली.

हेही वाचा >>> IPL 2022 Final GT vs RR : मोदी लावणार आयपीएल फायननला हजेरी? चर्चांना उधाण, अहमदाबादेत ६००० पोलीस तैनात

दरम्यान, २००८ साली शेन वॉर्न नेतृत्व करत असताना राजस्थानने ट्रॉफीवर नाव कोरले होते. तर आज पुन्हा एकदा संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखील राजस्थान संघ फायनलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will give your rupees back said shane warne to rajasthan royals owner manoj badale in ipl season 1 prd
First published on: 29-05-2022 at 16:22 IST