Chennai Super Kings vs Gujrat Titans, IPL Final Match Update : आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एम एस धोनी आणि हार्दिक पांड्या आमनेसामने येणार आहेत. पण हा सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर यंदाच्या आयपीएलच्या जेतेपदाचा कोणता संघ मानकरी ठरेल, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. पावसाने या सामन्यात खोडा घातल्यास कोणत्या संघाला विजेता घोषीत केला जाईल? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
सामना रद्द झाल्यास कोणता संघ बनेल चॅम्पियन?
प्ले ऑफ सामने आणि फायनलचे नियम खूप वेगळे आहेत. आयपीएलच्या लीग राऊंडमध्ये एखादा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक अंक दिला जातो. अशावेळी अनेक क्रिकेट प्रेमींच्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो की, जर आयपीएलच्या फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन बनेल..आयपीएल नियमांनुसार आयपीएल फायनलसाठी यावेळी रिझर्व्ह डे ठेवलेला नाहीय. यामुळे निर्धारीत सामन्यावेळी आयपीएल २०२३ च्या फायनल विजेत्या संघाची घोषणा केली जाईल.




फायनल सामन्यासाठी आयपीएलचा नियम
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांची वेळ उपलब्ध असेल. आयपीएल २०२३ च्या फायनलसाठी कट ऑफ टाईम जर ७.३० वाजता सुरु झाला, तर ५ षटक प्रति साइड गेमसाठी ११.५६ वाजेपर्यंत असेल. जर हे ८ वाजता सुरु झालं, तर कट ऑफ टाईम १२.२६ पर्यंत असेल. परंतु, सामन्याच एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघाला विजेता घोषीत केला जाईल.
सामना रद्द झाल्यास गुजरात टायटन्स बनणार चॅम्पियन
आयपीएल २०२३ च्या लीग राऊंडमध्ये १० सामने जिंकून गुजरातचा संघ गुणतालिकेत २० अंकांनी अव्वल स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या १४ सामन्यांमध्ये ८ सामने जिंकून १७ गुण मिळवले आहेत. त्यामुळे सीएसके दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच फायनलचा सामना पावसामुळं रद्द झाला तर, गुजरात टायटन्सचा संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल.