KL Rahul on Dhoni: भारताचा सलामीवीर के.एल. राहुलने “द रणवीर शो” या कार्यक्रमात काही विषयांवर स्पष्टपणे बोलले. के.एल. राहुल त्याच्या मांडीच्या शस्त्रक्रियेमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. राहुल म्हणाला की, “तो आतापर्यंत तीन कर्णधारांच्या हाताखाली खेळला आहे ज्यांची शैली आणि गुण एकमेकांपेक्षा वेगळे आहेत.”

धोनीच्या नेतृत्वाखाली राहुलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तो त्याला आपला गुरू मानतो. त्याचबरोबर त्याच्या कारकिर्दीतील बहुतांश सामने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळले गेले आहेत. कोहली इंटरनॅशनल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधारही राहिला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली राहुलने उपकर्णधार म्हणून अनेक सामने खेळले आहेत. या शोमध्ये राहुलने या तिन्ही कॅप्टन्सबद्दल सांगितले.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024: केकेआरविरुद्ध ८३ धावांची खेळी करूनही विराट कोहली का होतोय ट्रोल? RCBचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी

राहुल म्हणाला, “मी महान कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे, मी खेळायला सुरुवात केली तेव्हा धोनी माझा कर्णधार होता, तो माझा पहिला कर्णधार होता. धोनी त्याच्या खेळाडूंना कसा हाताळतो आणि तो किती शांत असतो हे मी पाहिले आहे. तो खेळाडूंशी चांगले संबंध कसे निर्माण करायचा हे मी त्याच्याकडून शिकलो आहे. माही नेहमी त्याच्या सहकाऱ्यांना समजून घेतो आणि त्यापद्धतीने रणनीती आखतो. यावरून तुम्हाला शिकायला मिळते की तुमचे इतर खेळाडूंशी चांगले संबंध असले पाहिजेत जेणेकरून ते तुम्हाला पाठिंबा देऊ शकतील, तुमच्यासाठी उभे राहू शकतील. ड्रेसिंग रूममध्ये माहीची अनुपस्थिती खूप जाणवते.”

हेही वाचा: IPL2023: राजस्थान वाचला, आता विराट कोहली हैदराबादला ४० धावांत गुंडाळणार? गोलंदाजी सरावाची पोस्ट व्हायरल

विराटबद्दल राहुल म्हणाला, “तो सहा-सात वर्षे भारताचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जे काही साध्य केले ते वाखाणण्याजोगी आहे, तुम्ही आकडेवारी पाहू शकता. तो संघात जो उत्साह आणि जोश आणतो, त्याने सर्व खेळाडू ताजेतवाने राहतात. त्याने त्याच्या कारकिर्दीत एक वेगळाच मापदंड तयार केला आहे. भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेले.”

राहुल पुढे म्हणाला की, “विराटने ज्या प्रकारे उर्वरित संघाचे नेतृत्व केले, त्याने सर्वांना दाखवून दिले की महानता कशी मिळवता येते. विराटने नियोजन केले आणि आम्ही सर्वांनी त्याचे अनुसरण केले. आम्ही सर्वांनी जे काही केले त्यातून प्रेरणा मिळाली आणि संघाने आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. ही अशी गोष्ट आहे जी विराटने निर्माण केली आहे आणि प्रत्येक खेळाडूला नम्र न राहण्याची शिकवण दिली आहे.”

हेही वाचा: IPL2023: “मी अजिबात त्याच्यासारखा शांत…”, एम.एस. धोनीला गुरु मानणाऱ्या फाफ डू प्लेसिसचे मोठे विधान

जेव्हा रोहितचा विचार केला जातो तेव्हा राहुलने सांगितले की, “रोहितला त्याचे काम चांगले माहित आहे, तो सामन्यापूर्वी संपूर्ण विरोधी संघातील सर्व माहिती काढतो. तो खेळाबाबत खूप दक्ष असतो.” राहुल म्हणाला, “रोहित शर्मा खूप हुशार आहे, कर्णधारपदाची वैशिष्ट्य असे आहे की त्याची रणनीती खूप सर्वोत्तम असते. तो सामन्यापूर्वी सर्व सामन्यांचे नियोजन करतो. त्याला प्रत्येक खेळाडूची ताकद समजते आणि तो कोणत्या परिस्थितीत काय करू शकतो हेही त्याला माहिती असते. विरोधी संघातील समस्या कुठल्या त्या तो बरोबर हेरतो आणि त्यावर काम करतो. हे सर्व गुण मी या सर्व कर्णधारांकडून शिकलो आहे.”