scorecardresearch

जडेजा ‘आयपीएल’बाहेर

चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे. ‘‘जडेजा चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. बरगडय़ांच्या दुखापतीमुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली. जडेजासाठी यंदाचा हंगाम विसरण्याजोगा ठरला. त्याला हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, चेन्नईने आठपैकी केवळ दोन सामने जिंकल्याने त्याने कर्णधारपद सोडले. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक ठरली. त्याने १० सामन्यांत ११६ धावा केल्या आणि केवळ पाच बळी मिळवले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Injured ravindra jadeja ruled out of ipl 2022 zws

ताज्या बातम्या