इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्सचे आव्हान कायम आहे. शुक्रवारी राजस्थानने चेन्नईचा चार गडी राखून पराभव केला. चेन्नईचे १७७ धावांचे लक्ष्य राजस्थानने सहा विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. जॉस बटलर हा राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ६० चेंडूत नाबाद ९५ धावांची खेळी केली.

जयपूरमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना पार पडला. पहिले फलंदाजी करणाऱ्या चेन्नईला २० षटकांत ४ गडी गमावून १७६ धावा करता आल्या. सलामीवीर शेन वॉटसनने ३९ धावांची खेळी केली. तर सुरेश रैनाने ५२ धावांची खेळी करत संघाचा डाव पुढे नेला. रैनाने ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. यात सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. धोनीने २३ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली. राजस्थानतर्फे आर्चरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

१७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात दमदार झाली. जॉस बटलर आणि बेन स्ट्रोक्स ही जोडी सलामीला आली. बटलरने फटकेबाजी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी ४८ धावांवर फोडण्यात चेन्नईला यश आले. स्ट्रोक्स ११ धावांवर बाद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेही ४ धावांवर बाद झाला. यामुळे राजस्थानवरील दबाव वाढला. संजू सॅमसनही २१ तर प्रशांत चोप्रा ८ धावांवर माघारी परतले. त्यामुळे बटलरचा वेगही मंदावला. स्टुअर्ट बिन्नी २२ धावांची खेळी माघारी परतला. ब्राव्होने त्याचा अडथळा दूर केला. दुसऱ्या बाजूने बटलरने झुंजार खेळी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. कृष्णप्पा गौतमने मोक्याच्या क्षणी चार चेंडूत १३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत १२ धावांची आवश्यकता होती. पण बटलर मैदानात असल्याने राजस्थानने पाच चेंडूमध्ये १२ धावा केल्या आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

अपडेट्स

राजस्थान गुणतालिकेत सहाव्या स्थानी

कृष्णप्पा गौतम माघारी, चार चेंडूत १३ धावा चोपून बाद.

स्टुअर्ट बिन्नी २२ धावांवर बाद, कृष्णप्पा गौतम मैदानात

जॉस बटलरचे अर्धशतक, राजस्थानची मदार जॉस बटलरवर

राजस्थानचे चार गडी बाद

राजस्थानला दोन झटके, बेन स्ट्रोक्स आणि अजिंक्य रहाणे बाद

जॉस बटलरची आक्रमक सुरुवात

जॉस बटलर आणि बेन स्ट्रोक्स मैदानात

राजस्थान रॉयल्स या संघाची बॅटिंग सुरु

चेन्नईचे राजस्थानच्या संघापुढे विजयासाठी १७७ धावांचे आव्हान

चेन्नईच्या टीमला चौथा झटका, सॅम बिलिंग्ज आऊट

एम. एस. धोनी आणि सॅम बिलिंग्ज मैदानावर

चेन्नईच्या टीमला तिसरा झटका, सुरेश रैना झेलबाद

चेन्नईच्या टीमला दुसरा झटका, शेन वॉटसन झेलबाद

चेन्नईच्या टीमला पहिला झटका, अंबाती रायडू आऊट

चेन्नईची आक्रमक सुरुवात

शेन वॉटसन आणि अंबाती रायडू मैदानावर

चेन्नई सुपरकिंग्जचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

चेन्नई सुपरकिंग्जने टॉस जिंकला