इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामाला कालपासून सुरुवात झाली. या हंगामातील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान खेळण्यात आला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी सुरुवात केली. या सामन्यादरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. आर्यन खानचे एका मुलीसोबतचे काही फोटो व्हायरल होताना दिसत असून त्यांची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यन हा कोलकाता नाइट रायडर्सला प्रोत्साहन देतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत आर्यनसोबत एक सुंदर मुलगीही दिसत आहे. तिच्या आणि आर्यनच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतानाही दिसत आहे. आर्यन खानसोबत असलेली ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण? असा प्रश्नही नेटकरी विचारताना दिसत आहे.

कोलकाता नाइट रायडर्सच्या अनेक सामन्यात शाहरुख खान हा आवर्जुन हजर असतो. मात्र सध्या शाहरुख हा त्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे काल झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्याऐवजी त्याचा मुलगा आर्यन खान त्याच्या संघाला सपोर्ट करताना दिसला. यावेळी आर्यनने काळ्या रंगाच्या टी-शर्ट परिधान केले होते. यावेळी तो त्याच्या टीमला प्रोत्साहन देताना दिसत होता. यादरम्यान तो त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारतानाही दिसत आहे.

यावेळी आर्यन खानच्या बाजूला एक मुलगी पाहायला मिळत आहे. ही मुलगी नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कालच्या सामन्यानंतर आर्यन खानचे तिच्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान काल झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना केवळ १३१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने हा सामना ९ चेंडू आणि सहा गडी राखून जिंकला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 aryan khan seen with mystery girl kkr and csk match see viral photos nrp
First published on: 27-03-2022 at 15:57 IST