आयपीएल २०२२ स्पर्धेतील कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या सलामीच्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल जोडीने दमदार खेळी केली. २० षटकात एकही गडी न गमवता २१० धावांची भागीदारी केली. या खेळीत क्विंटन डी कॉकने नाबाद १४० धावांची खेळी केली. त्याने ७० चेंडून १० चौकार आणि १० षटकाराच्या मदतीने १४० धावा केल्या. डी कॉकने मोसमातील पहिले शतक झळकावले. आयपीएलमधील डि कॉकची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. डी कॉक आयपीएलमध्ये २०१५ पासून खेळत असून त्याचं पहिलं शतक आहे. शतक ठोकताच डी कॉकने बॅटवर ठोसा मारला आणि जमिनीवर गुडघ्यावर बसून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या खेळीबद्दल मैदानात उपस्थित क्रिकेटप्रेमींना टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. त्यानेही बॅट उंचावून टाळ्यांचा स्वीकार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वादळी खेळीनंतर डी कॉक आपल्या भावना व्यक्त करत म्हणाला की, “गेल्या काही सामन्यात ज्या प्रकारे बाद होत होतो. त्यामुळे मी निराश झालो होतो. त्यामुळे नेमकं काय करावं कळत नव्हतं. पण मी निराशेतून बाहेर पडत माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत केलं. माझ्या खेळीतून निराशा बाहेर पडली आहे. त्यावेळी मी काय विचार करत होतो, हे मला माहिती नाही. पण आता मी समाधानी आहे. “, असं डी कॉकनं स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं.

लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा रोमांचक सामन्यात पराभव केला. यासह कोलकाता संघ आयपीएल-२०२२ मधून बाहेर पडला आहे. २११ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना जवळपास जिंकला होता, मात्र शेवटच्या षटकात रिंकू सिंहची विकेट पडल्याने त्यांचे स्वप्न भंगले. कोलकाताला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती, पण इथे विकेट पडली आणि लखनऊचा संघ जिंकला. या विजयासह लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 century against kkr quinton de kock reveals reason rmt
First published on: 19-05-2022 at 10:38 IST