आयपीएल २०२२ च्या २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. रविवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्येमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात ‘किलर मिलर’ डेव्हिड मिलरच्या नाबाद ९४ धावांच्या तुफानी खेळीमुळे गुजरात संघाने चेन्नईच्या तोंडून सामना हिसकावून घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम अयशस्वी ठरत आहे. आयपीएल २०२२ मध्ये, सीएसकेने आतापर्यंत पाच सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रवींद्र जडेजाने याबाबत भाष्य केले आहे.

या सामन्यात रशीदने चेंडूऐवजी बॅटने अप्रतिम खेळी केली. त्याने अवघ्या २१ चेंडूत ४० धावा केल्या. पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने सांगितले की, शेवटच्या पाच षटकांमध्ये आम्ही आमच्या योजनेप्रमाणे खेळू शकलो नाही. शेवटी त्याने ख्रिस जॉर्डनला गोलंदाजी का दिली हेही जडेजाने सांगितले.

“आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, पण डेव्हिड मिलरने खूप चांगले शॉट्स खेळले, याचे श्रेय त्याला जाते. पण शेवटच्या पाच षटकांमध्ये आम्ही आमची योजना पूर्ण करू शकलो नाही. जॉर्डन हा अनुभवी गोलंदाज आहे त्यामुळे आम्ही २०व्या षटकात त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तो चार किंवा पाच यॉर्कर टाकू शकतो पण दुर्दैवाने आज तसे झाले नाही,” असे रविंद्र जडेजा म्हणाला.

चेन्नईसाठी जॉर्डन चांगलाच महागात पडला. त्याने सामन्यात ३.५ षटकात ५८ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. याआधी १८व्या षटकातही त्याच्याविरुद्ध राशिद खानने जोरदार फटका मारला होता. राशिदने आपल्या षटकात तीन षटकार आणि एक चौकार मारून एकूण २५ धावा घेतल्या. इथूनच सामना फिरला. नंतर शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी १३ धावा हव्या होत्या आणि मिलरने त्या एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केल्या.

डेव्हिड मिलरचा चमत्कार

चेन्नई सुपर किंग्जच्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन्सने १६ धावांत तीन विकेट गमावल्या. मात्र डेव्हिड मिलरने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रशीद खानने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची तुफानी भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 csk vs gt ravindra jadeja told why did he have to bowl to chris jordan in the over abn
First published on: 18-04-2022 at 08:10 IST