किलर द मिलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्णधार डेव्हिड मिलरच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा धुव्वा उडवला. सामन्याच्या शेवटच्या तीन षटकांपूर्वी चेन्नई विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत होते, पण राशिद खानने १८ व्या षटकात ख्रिस जॉर्डनला तीन षटकार आणि एक चौकार ठोकून बाजी मारली. शेवटच्या षटकात मिलरने एक चौकार आणि एक षटकार ठोकत गुजरातला तीन विकेट्सने रोमांचक विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

गुजरातला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या सात षटकात ९० धावांची गरज होती आणि संघासाठी ते कठीण दिसत होते. पण ‘किलर मिलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड मिलरचा हेतू वेगळा होता. मिलरने कर्णधार राशिद खानच्या साथीने अवघ्या ३७ चेंडूत ७० धावांची धमाकेदार भागीदारी करत चेन्नईकडून विजय खेचत आणला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या डावातील १८व्या षटकात राशिदने २५ धावा केल्या, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. मिलरनेही नंतर कबूल केले की हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट होता.

Action against Samson for slow over rate
IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?
Rajasthan Royals Vs Gujarat Titans Match Highlights in Marathi
RR vs GT : गुजरातने राजस्थानचा विजयरथ रोखला, राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
Brilliant performances by Sai Sudarshan and Mohit Sharma
GT vs SRH : साई-मोहितच्या जोरावर गुजरातचा शानदार विजय, हैदराबादला ७ विकेट्सनी चारली धूळ
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Match UpdateS
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय, रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १२ धावांनी पराभव

“माझ्या कारकिर्दीत मी फक्त चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण आज आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप विकेट गमावल्या त्यामुळे मला माझा खेळ बदलावा लागला. राशिदने माझ्यावरचा दबाव हटवला. दुसर्‍या टोकाला कोणीतरी अशी धावा घेतो तेव्हा ते खरोखरच खास असते. ज्या षटकात त्याने २५ धावा घेतल्या तो टर्निंग पॉइंट होता आणि आम्ही सामना जिंकला. आम्हाला आशा आहे की आम्ही ही विजयी गती यापुढेही कायम ठेवू,” असे  सामन्यानंतर मिलर म्हणाला.

यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही त्याच्या खास शैलीत गुजरात टायटन्ससह डेव्हिड मिलरचे कौतुक केले आहे. ट्विटरवर वसीम जाफरने एक मजेदाक मीम शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याच्या मते, गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जकडून विजय कसा चोरला याचे उत्तम वर्णन केले आहे.

रशीदची कर्णधारपदाची खेळी चेन्नईसाठी ठरली घातक

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद स्विकारलेल्या राशिदने २१ चेंडूत ४० धावांची जबरदस्त खेळी केली. जॉर्डनने टाकलेल्या १८व्या षटकात रशीदने तीन षटकार आणि एक चौकार मारून सामना गुजरातच्या बाजूने वळवला. राशिदने २१ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याचवेळी मिलरने ५१ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार मारत ९४ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने शेवटच्या चार षटकांत ५२ धावा देत सहा सामन्यांतील पाचवा विजय नोंदवला.