scorecardresearch

Live

IPL 2022, CSK vs KKR Live: सहा गडी राखून केकेआरचा विजय, चेन्नईचा पराभव

IPL 2022, CSK vs KKR Live Score : केकेआर टीम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चेन्नईशी दोन हात करतेय.

CSK vs KKR Live , IPL 2022 Match 1 Live
CSK vs KKR Live , IPL 2022 Match 1 Live

IPL 2022, CSK vs KKR Live Score Updates : क्रिकेट चाहते मागील वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आजपासून आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली असून या हंगामात एकूण १० संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन संघ वाढल्यामुळे यावेळी सामन्यांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना खेळवला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. केकेआर टीम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चेन्नईशी दोन हात करतेय. तर धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व रविंद्र जाडेजा करत असून हा सामना जिंकून स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान जाडेजापुढे आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलीय.

Live Updates
20:17 (IST) 26 Mar 2022
रॉबिन उथप्पाच्या रुपाने चेन्नईला तिसरा झटका

रॉबिन उथप्पाच्या रुपाने चेन्नईला तिसरा झटका बसला आहे. चेन्नईची दयनीय स्थिती झाली असून आतापर्यंत चेन्नईच्या फक्त ५२ धावा झाल्या आहेत.

19:57 (IST) 26 Mar 2022
चेन्नईला दुसरा झटका, डेव्हॉन कॉन्वे ३ धावांवर बाद

चेन्नईला दुसरा झटका बसला असून डेव्हॉन कॉन्वे फक्त ३ धावांवर बाद झाला आहे. ३० धावसंख्येच्या आत चेन्नईचे दोन गडी बाद झाले असून ही चेन्नईसाठी चिंताजनक असल्याचे म्हटले जातेय.

19:39 (IST) 26 Mar 2022
चेन्नईला पहिला झटका, ऋतुराज गायकवाड बाद

चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिला झटका बसला आहे.

19:20 (IST) 26 Mar 2022
कोलकाता नाईट रायडर्सचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय.

18:56 (IST) 26 Mar 2022
कोलकाता नाईट रायडर्सचे प्लेइंग इलेव्हन

व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, चमिका करुणारत्ने, सुनील नरेन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव

18:55 (IST) 26 Mar 2022
चेन्नई संघाचे प्लेइंग इलेव्हन

चेन्नई संघाचे प्लेइंग इलेव्हन

डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), महीश थिक्षाना/ख्रिस जॉर्डन, ड्वेन ब्राव्हो, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने

18:53 (IST) 26 Mar 2022
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार पहिल्या सामन्याचा थरार

आयपीएल २०२२ हंगामातील पहिल्या सामन्याच्या थराराला काही क्षणांत सुरुवात होणार असून हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जातोय. यावेळी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

18:49 (IST) 26 Mar 2022
कोलकातानेही कसली कंबर, पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार

तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायर्डसनेही पहिला सामना जिंकण्यासाठी कंबर कसली असून संघ पूर्ण ताकतीनीशी मैदानात उतरणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स चेन्नईशी दोन हात करणार आहे.

18:45 (IST) 26 Mar 2022
रविंद्र जाडेजा करणार चेन्नईचं नेतृत्व

या हंगामात चेन्नईचं नेतृत्व रविंद्र जाडेजा करणार असून महेंद्रसिंह धोनीचे त्याला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन असेल.

18:44 (IST) 26 Mar 2022
चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडियमकडे रवाना

काही क्षणांत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार असून चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडियमकडे निघाला आहे. आजचा सामना चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये होणार आहे.

Web Title: Ipl 2022 csk vs kkr live updates chennai super kings vs kolkata knight riders match score details

ताज्या बातम्या